नवी दिल्ली, 22 मे : देशभरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी वाढविण्यात आला आहे. सध्या देशभरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी हा लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत MINISTRY OF STATISTICS AND PROGRAM IMPLEMENTATION चे सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी मोठा खुलासा केला आहे. विविध संस्थांकडून लॉकडाऊन नसता तर देशातील परिस्थिती भयावह झाली असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. जर लॉकडाऊन लागू केला नसता तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 36 ते 70 लाखांपर्यंत पोहोचली असती. मात्र लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोक घरात थांबले होते. त्यामुळे या आजाराचा फैलाव रोखण्यात आला. लॉकडाऊनमुळे 78183 मृत्यू रोखण्यात आले आहे. तर 23 लाख केसेस रोखण्यात आले आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टेटिस्टिक्स एन्ड प्रोग्राम इम्पलीमेंटेशन संस्थेने अंदाज लावला आहे की लॉकडाऊनमुळे 20 लाखांपर्यंतचे केसेस रोखण्यात आले आहे. याशिवाय 54000 मृत्यू रोखण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू नये हा त्यामागील उद्देश आहे. लॉकडाऊनमुळे 14 ते 29 लाख कोरोना केसेस आणि 37-78 हजार मृत्यू रोखण्यात आल्याचे यावेळी समोर आले आहे. हे वाचा - अमिताभ-आयुष्मान करणार मालक-भाडेकरू बनून तु तु मैं मैं! ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर कोरोनाला मारण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांगितला नवा फॉर्म्युला, असा असेल प्लॅन धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने माजी मंत्र्याच्या PSO ची फाशी लावून आत्महत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







