Home /News /national /

कोरोनाच्या भीतीने माजी मंत्र्याच्या PSO ची आत्महत्या; सुसाईड नोटमधून झाला धक्कादायक खुलासा

कोरोनाच्या भीतीने माजी मंत्र्याच्या PSO ची आत्महत्या; सुसाईड नोटमधून झाला धक्कादायक खुलासा

कोरोनाची झपाट्याने वाढणारी संख्या पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

    रायपूर, 22 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या या संकटात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. छत्तीसगडचे माजी मंत्री रामविचार नेताम यांचे पीएसओ यांनी फाशी लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्लाटून कमांडर छन्नराम यांनी शांतिनगर सिंचाई कॉलनीस्थित सरकारी निवासस्थानी आत्महत्या केली. पोलिसांना त्यांच्या घरातून मिळालेल्या सुसाईट नोटमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माजी मंत्री आणि आमदार रामविचार नेताम यांचे पीएसओ छत्रराम साईंतोडे यांनी आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केली. पीएसओ यांनी एक सुसाईट नोट लिहिली आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. भाजपा नेता आणि माजी मंत्री रामविचार नेताम  यांचे पीएसओ छत्रराम शांतीनगरमधील सिंचाई कॉलनी येथील सरकारी निवास गृहात राहत होते. गुरुवारी दुपारी छत्रराम यांनी फाशी लावून आत्महत्या केली. घटनास्थळी मिळाली सुसाईट नोट पीएसओने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी ते एकटे घरात होते. त्यांची पत्नी भिलाई येथे आपल्या मुलीच्या घरी गेली होती. मुलगा त्यांच्यासोबतच घरी राहत होता. मात्र घटनेच्यावेळी तो मित्राच्या घरी कमल विहारमध्ये गेला होता. मुलगा घरी आल्यानंतर वडिलांना लटकत असल्याचे पाहून तो घाबरला. त्यांनी सुसाईट नोटमध्ये कोरोनाला घाबरुन आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. तपासात कर्ज झाल्याचीही माहिती समोर आली आहे. हे वाचा - 'कोव्हिड-19 टेस्टिंगच्या नावाखाली बिझनेस, रुग्णाकडून घेतले जात आहेत 3 हजार' काँग्रेस प्रवक्ता संजय झा कोरोना पॉझिटिव्ह; काळजी घेण्याचं केलं आवाहन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona virus in india, Sucide

    पुढील बातम्या