जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Big news : राजकीय भूकंपाचा भाजप आहे का सूत्रधार? मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला, खलबतांना वेग

Big news : राजकीय भूकंपाचा भाजप आहे का सूत्रधार? मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला, खलबतांना वेग

Big news : राजकीय भूकंपाचा भाजप आहे का सूत्रधार? मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला, खलबतांना वेग

या बंडात 50 टक्के भाजप आणि 50 टक्के ईडीचा वाटा असल्याचा धक्कादायक आरोप या अपक्ष आमदाराने केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहाटी, 23 जून : शिवसेनेचे तब्बल 41 ते 43 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर ते सुरतहून आसामच्या गुवाहाटीला रवाना झाले आहे. काही वेळापूर्वीच शेजारील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले आहेत. कॉनराड संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख आहेत. संगमा हे भाजप समर्थक आहेत. भाजपनेच या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी पाठवलं का? अशी चर्चाही सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या आमदारांनी धक्कादायक आरोप केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचं बंड हे भाजपने घडवून आणलं असल्याचा आरोप केला आहे. या बंडात 50 टक्के भाजप आणि 50 टक्के ईडीचा वाटा असल्याचा धक्कादायक आरोप या अपक्ष आमदाराने केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक तज्ज्ञांनी या सर्व कटामागे भाजप असल्याचा दावा केला जात आहे. त्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांसोबत भाजप नेतेही दिसून आले. आणि आज तर थेट भाजप समर्थक मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला आल्याने त्या कॉन्स्परसी थिअरीवर शिक्कामोर्तब केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय अपडेट.. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळेल की पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईलच. पण सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसची (Congress) चिंता वाढेल, असंच चित्र आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याची साद घालताना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानाकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कशा पद्धतीने बघतं हे महत्त्वाचं आहे. काँग्रेसकडून संजय राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्यातरी या भूमिकेवर रोखठोक भूमिका घेण्यात आलेली नाही. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस सध्या वेट अॅण्ड वॉच भूमिकेवर असू शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तसंच काहीसं विधान केलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी आपण विरोधी बाकावर बसायलाही तयार असल्याचं विधान केलं आहे. त्यांच्या याबाबतच्या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. त्याबद्दल असं काही नाही. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे ते अंतर्गत विचार करुन केलं असेल”, असा दावा त्यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात