भुसावळ, 11 फेब्रुवारी : राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्या उद्याच्या भुसावळ दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेले शुभेच्छा फलक भुसावळ नगरपालिकेने काढून टाकले आहेत. कार्यकर्त्यांनी शहरात 107 फलक लावले होते. भुसावळ नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचं कारण पुढे करून नाकारण्यात आली होती. त्यामुळे भुसावळ शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जयंत पाटील यांचे फलक काढून फेकत असताना दिसत आहे. या प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. राष्ट्रवादी राज्यातील विविध भागांमध्ये दौरे करीत आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी नेते दौरे करीत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांचे उत्तर महाराष्ट्रावर वर्चस्व आहे. हे ही वाचा- धनंजय मुंडे प्रकरणाची पुन्हा चर्चा; भाजप नेत्याचा शरद पवारांना खडा सवाल
राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या उद्याच्या भुसावळ दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेले शुभेच्छा फलक भुसावळ नगरपालिकेने काढून टाकले आहेत. pic.twitter.com/A7NCPXMDEb
— News18Lokmat (@News18lokmat) February 11, 2021
अशात भुसावळमधील घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उद्याच्या भुसावळ दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शहरात शुभेच्छा फलक लावले होते. भुसावळ नगरपालिकेने 107 फलक काढून टाकले आहेत.