Home /News /news /

नागपूर हादरलं! अल्पवयीन मुलीसह आई आणि आजीवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार

नागपूर हादरलं! अल्पवयीन मुलीसह आई आणि आजीवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार

'तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल'

नागपूर, 18 जानेवारी: भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं एका भोंदूबाबानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं राज्याची उपराजधानीचं शहर नागपूर हादरलं आहे. शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू होईल, अशी भीती दाखवत नराधम भोंदूबाबनं 17 वर्षीय मुलीवर दोन महिने लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे नराधमानं पीडित मुलीच्या कुटुंबातील तीन महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. ही संतापजनक घटना नागपुरात पारडी परिसरात घडली आहे. पारडी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे. हेही वाचा...मुंबईतली धक्कादायक बातमी! 60 लाखांत मुलगी तर दीड लाखांत मुलाचा करायचे सौदा मिळालेली माहिती अशी की, धक्कादायक म्हणजे आरोपी भोंदूबाबनं भूतबाधा उतरविण्याचं बहाण्यानं पीडित तरुणीच्या आई, आजी आणि मामीवरही अत्याचार केला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी नराधम भोंदूबाबाला अटक केली आहे. धमेंद्र निनावे उर्फ दुलेवाले असं नराधमाचं नाव आहे. भोंदूबाबनं भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील तीन महिला नातेवाईकांवर लैंगिक अत्याचार केला. भोंदूबाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र आहे. दोन वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या तो संपर्कात होता. काही महिन्यांपूर्वी हा भोंदूबाब पीडित तरुणीच्या घरी आला आणि 'तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल, अशी भीती त्यानं दाखवली होती. त्यासाठी तुम्हाला पूजा करावी लागेल, असं सांगत मुलीवर भूताचा अधिक प्रभाव असल्याचं तो म्हणाला. त्यानंतर या भोंदूबाबानं भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो पीडित मुलीला घरी घेवून गेला आणि दोन महिने तिच्यावर अत्याचार केला. हेही वाचा...चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा, म्हणाले 2 दिवसांत घेतो स्फोटक पत्रकार परिषद इतकेच नव्हे तर पीडितेची आई, मामी आणि आजीवरही या भामट्यानं अत्याचार केला. पूजेच्या बहाण्याने या भोंदूबाबनं पीडित मुलीसह आई, मामी आणि आजीवरही चंद्रपूर, डोंगरगड येथे भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं कुकर्म केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Crime news, Nagpur, नागपूर

पुढील बातम्या