बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बंद

बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बंद

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 18 मे : मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवार 18 मेपासून बेमुदत बंद पुकारला आहे. अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या अन्यथा संप करू असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला होता. पण त्यावर दोन दिवस कोणताचा निर्णय घेतल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ शकतो. म्हणून सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून तब्बल 1000 बसेस मुंबईत मागविण्यात आल्या. सोमवारपासून संप करण्याची बेस्ट वर्कर्स युनियनची हाक दिली तर संप मोडून काढण्याच्या पवित्र्यात सरकार असून त्यांनी तशी तयारीही केली आहे.

या अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट सुमारे 3260 कामगार काम करत आहेत. दररोज 'बेस्ट'च्या बस या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार या सर्वांची मुंबईच्या आणि मुंबईच्या बाहेरून ने आण करत आहेत.

आजपासून तुमच्या शहरात काय उघणार आणि काय राहणार बंद, वाचा लॉकडाउन 4.0

या सेवेमुळे मुंबईला एक मोठा आधार मिळतो. परंतु बेस्ट प्रशासन मात्र या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप बेस्ट कामगार कृती समितीने केला आहे. आतापर्यंत बेस्ट सुमारे 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 7 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असं असलं तरीही बेस्ट प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा कवच दिले नाही. सोबतच या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी कुठला वेगळी व्यवस्था केलेली नाही.

या कर्मचाऱ्यांना कामावर हजर असताना मास्क सॅनिटायझर किंवा इतर सुरक्षात्मक साधनं पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेली नाहीत. त्यामुळे आपण संपाच्या निर्णयापर्यंत पोहोचलो असल्याची प्रतिक्रिया संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली होती. त्यामुळे आजपासून बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून स्वतःच्या सुरक्षेसाठी घरीच रहावं असं आवाहन कृती समितीनं आपल्या सदस्यांना केलं आहे.

लॉकडाउन 4.0मध्ये देशात 12 तास असणार कर्फ्यू, अशा आहेत नव्या अटी

आमची सेवा हवी असेल तर आम्हाला सुरक्षात्मक उपाय सुद्धा दिले गेले पाहिजे. अन्यथा आम्ही सेवा देऊ शकणार नाही असं कर्मचाऱ्यांचं मत आहे. ज्या सुविधा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे, त्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना का नाही असा सवालही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि बेस्टचे कर्मचारी यांच्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेसमोर एक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यावर प्रशासनाने लवकर तोडगा काढावा यासाठी कृती समितीने केवळ तीन दिवसाचा कालावधी दिला होता. पण त्यावर अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुंबईकरांचं संकट वाढणार? 'साधे मास्क नाहीत, सॅनिटायजर नाही, काम कसं करणार?'

संपादन - रेणुका धायबर

First published: May 18, 2020, 7:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading