advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / आजपासून तुमच्या शहरात काय उघडणार आणि काय राहणार बंद, वाचा लॉकडाउन 4.0

आजपासून तुमच्या शहरात काय उघडणार आणि काय राहणार बंद, वाचा लॉकडाउन 4.0

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद यावर गोंधळून जाऊ नका. वाचा संपूर्ण अपटेड

01
देशात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 4.0 लागू करण्याचा निर्णय घेतला. आजपासून म्हणजेच 18 मे पासून लॉकडाऊन सुरू झालं आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन 4.0 मध्ये काही गोष्टी शिथिल केल्या आहेत. यावेळी काय खुलं असणार आणि काय बंद जाणून घेऊयात...

02
लॉकडाऊन 4.0 मध्येही सरकारनं शाळा व महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ऑनलाइन वर्ग आणि कोर्स सुरू ठेवू शकतात.

03
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा 31 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विमानतळ आणि उड्डाणांमध्ये सामाजिक अंतराचं अनुसरण करणं फार कठीण आहे, अशा परिस्थितीत उड्डाणें 31 मेपर्यंत बंद राहतील.

04
केंद्र सरकारने 31 मेपर्यंत संपूर्ण देशात मेट्रो, ट्रेन सेवा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली मेट्रोकडून नव्या नियमांसह मेट्रो ऑपरेशनची तयारी सुरू असली तरी केंद्राची मान्यता मिळाली नाही तर त्याचे कामकाजही ठप्प होईल.

05
अटी व शर्तींसह बससेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडण्यात आला आहे. परस्पर करारानुसार, दोन राज्यं एका राज्यातून दुसर्‍या राज्यात बस चालवण्यास परवानगी देऊ शकतात.

06
लॉकडाऊन 4 मधील मॉल, सिनेमा हॉल आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलिव्हरी होईल. तसंच, सलूनची दुकानं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा. राज्य सरकार मिठाई किंवा इतर दुकानं यासारख्या अन्य व्यावसायिक उघडण्याच्या निर्णयावर निर्णय घेतील. कोणत्याही कंटेनमेंट झोनमध्ये याची अनुमती नाही.

07
31 मेपर्यंत धार्मिक स्थळही बंद राहतील. यावेळी ईदचा सण लॉकडाऊन दरम्यानच साजरा केला जाईल हे स्पष्ट आहे. यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान नवरात्रोत्सवही साजरा करण्यात आला.

08
लॉकडाऊन 4 दरम्यान केंद्र सरकारनं आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोन निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. तसंच बफर आणि कंटेनमेंट झोन देखील तयार केले गेले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • देशात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 4.0 लागू करण्याचा निर्णय घेतला. आजपासून म्हणजेच 18 मे पासून लॉकडाऊन सुरू झालं आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन 4.0 मध्ये काही गोष्टी शिथिल केल्या आहेत. यावेळी काय खुलं असणार आणि काय बंद जाणून घेऊयात...

    MORE
    GALLERIES