मुंबई 16 मे : बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून अत्यावश्यक सेवा न देता लॉकडाऊन मध्ये जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला होता. आपण अजूनही या निर्णयावर ठाम असल्याचं कृतिसमितीने सांगितलेला आहे. बेस्ट कर्मचारी सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स ,पोलीस कर्मचारी यांची ने आण करीत आहेत. परंतु ही सेवा देत असताना बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात आलेले नाही. सोबतच सुरक्षात्मक उपाय म्हणजेच मास्क सॅनिटायजर या गोष्टी पुरवठाही मुबलक प्रमाणात होत नाहीये. त्यामुळेच आत्तापर्यंत बेस्ट शंभर कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. तर आत्तापर्यंत सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही काम तरी कसं करायचं असा प्रश्न कर्मचारी संघटनांनी विचारला असून संपावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. बेस्ट प्रशासन जर आमची सुरक्षा करू शकत नसेल तर कर्मचाऱ्यांनाच स्वतःच्या सुरक्षेसाठी लॉक डाऊन चे पालन करून घरी राहावे लागेल. त्यामुळेच बेस्ट कृती समितीने असा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. या बाबींची पूर्तता करण्यासाठी कृती समितीने तीन दिवसाचा कालावधी बेस्ट प्रशासनाला दिला होता. परंतु अद्याप कृती समितीच्या मागण्या बाबत बेस्ट प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने कृती समितीने आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला सुरक्षा विमा आमच्या कर्मचाऱ्यांनाही द्या आणि सुरक्षात्मक उपाययोजना पूर्वा इतकेच आमची मागणी आहे. पुण्याहून ट्रकमध्ये लपून 33 मजुरांचा जीवघेणा प्रवास सुरूच बेस्ट प्रशासनाने रात्री निर्णय घेतला तरी आम्ही सकाळपासून कामावर येऊ असं अशी प्रतिक्रिया कृती समितीचे सदस्य असलेल्या काँग्रेस युनियनचे नितीन पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे बेस्ट प्रशासन हे पी पी इ किट मास्क टायझर इत्यादी वस्तूंचा पुरवठा करेल. औषधोपचार करेल पण विम्याबाबत निर्णय घेण्याची सध्या परिस्थिती नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये Sex buddy शोधा; या देशाच्या सरकारनं दिला अजब सल्ला
दुसरीकडे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या मी आणि ची व्यवस्था करण्यात आली आहे. असं परिपत्रक बेस्ट च्या वतीने काढण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमवारी गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सोमवारी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.