• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 'बेळगावला शक्य, मग महाराष्ट्राला का नाही?' संतप्त कोल्हापूरकरांचा ठाकरे सरकारला सवाल

'बेळगावला शक्य, मग महाराष्ट्राला का नाही?' संतप्त कोल्हापूरकरांचा ठाकरे सरकारला सवाल

कोल्हापूरच्या विमानतळाची उभारणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. त्यानंतर गेल्या दशकात तब्बल सहा वर्ष कोल्हापूरची विमानसेवा ही पूर्णपणे बंद होती

  • Share this:
कोल्हापूर, 12 फेब्रुवारी : कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातलं एक सधन शहर. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेलं कोल्हापूर शहर. आणि याच कोल्हापूर शहरापासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर आहे. बेळगाव शहराला तर कर्नाटक राज्याने उपराजधानीचा दर्जा दिला आहे आणि याच बेळगाव मधून महाराष्ट्रातल्या तब्बल चार शहरांना आणि देशातल्या दहा शहरांना विमानसेवा उपलब्ध झाली आहे. पण करवीर काशी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर शहरातून राजधानी मुंबईलाही व्यवस्थित विमानसेवा सुरु नाहीये. ही बाब जरी वेगळी वाटत असली तरी हे सत्य आहे. कारण बेळगावमधून लवकरच महाराष्ट्राची उपराजधानी अशी ओळख असलेल्या नागपूर शहरासाठी लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. कोल्हापूरच्या विमानतळाची उभारणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. त्यानंतर गेल्या दशकात तब्बल सहा वर्ष कोल्हापूरची विमानसेवा ही पूर्णपणे बंद होती, पण केंद्र सरकारची उडान योजना आली आणि कोल्हापूर मधून हैदराबाद, बंगळुरु विमान सेवा सुरू झाली तिरुपतीची सेवाही सुरू झाली मात्र मुंबईची सेवा कायमच विस्कळीत राहिली. आताही लॉकडाऊन संपलेला असला तरी मुंबईसाठी कोल्हापूरमधून आठवड्यातून फक्त तीनच दिवस विमानसेवा सुरू आहे तेही विमान कधी वेळ येते तर कधी येतच नाही आणि या उलट परिस्थिती मात्र उपराजधानी असलेल्या बेळगाव शहरात पाहायला मिळते. हे ही वाचा-अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच अजान सुरू झाला, त्यानंतर... सध्या बेळगाव मधून हैदराबाद, बंगळुरू, इंदोर, पुणे, मैसूर , तिरुपती, कडप्पा, सुरत, अहमदाबाद , मुंबई , नाशिक,  चेन्नई , जोधपूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे आणि येत्या महिन्यात लवकरच नागपूरसाठीही विमानसेवा आता सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बेळगाव विमानतळावरून जास्तीत जास्त विमान सेवा देणारी स्टार एयर ही कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधील प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांची आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगपती असूनही त्यांची विमानसेवा कोल्हापूर विमानतळावरून सुरू होऊ शकत नाही त्याची कारणंही तशीच आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. तर टर्मिनल इमारत उभारण्याचे कामही गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे या सेवा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या विमान कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्यास उत्सुक नाहीत त्यातच कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग होऊच शकत नाही. संध्याकाळी साडेपाच नंतर कुठलंही विमान कोल्हापूर विमानतळावर उतरू शकत नाही, किंवा उड्डाण घेऊ शकत नाही आणि यामुळेच कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसल्याची चर्चा सध्या दक्षिण महाराष्ट्रमध्ये आहे कोल्हापूर सातारा सांगली या दक्षिण महाराष्ट्रातील अनेक राजकारणी, उद्योजकांना बेळगाव विमानतळाचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबईला विमानाची कनेक्टिव्हिटी कोल्हापूर मधून मिळत नसताना बेळगाव मधून मात्र देशभरातली शहर विमान सेवेद्वारे जोडली जात आहेत त्यामुळे बेळगावला किंवा कर्नाटकला जे शक्य आहे ते महाराष्ट्राला का नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय. सध्या कोल्हापूर मधून हैदराबाद , बंगळुरू विमानसेवा सुरळीत सुरू आहे त्यामुळे संपूर्ण आठवडाभर मुंबईलाही विमानसेवा दररोज सुरू करावी अशी मागणी होत आहे याबाबत राज्य सरकार, विमानतळ प्राधिकरणाने जातीने लक्ष घालून कोल्हापूरकरांना जास्तीत जास्त शहरांची विमान सेवा देण्याची गरज आहे...
Published by:Meenal Gangurde
First published: