नागपूर, 26 ऑगस्ट: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडविणारी आणि गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 'होम ट्युशन'मध्ये दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर बळीराम नाडेकर (वय-48) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी अंबाझरी भागात ही घटना घडली.
मिळालेली माहिती अशी की, पीडित मुली 9 वर्षांच्या असून त्या चुलत बहिणी आहेत. आरोपी ज्ञानेश्वर नाडेकर हा एका शाळेत कंत्राटी शिक्षक आहेत. तसेच तो होम ट्युशनही देतो. 9 वर्षीय दोन चुलत बहिणींनाही तो 'होम ट्युशन' देत होता. यादरम्यान त्याने दोघींशी अश्लील चाळे केले. एवढेच नाही तर याबाबत कुठे वाच्यता केल्यास आई-वडिलांना ठार मारेल, अशी धमकी त्याने दोघींना दिली होती. शनिवारीही आरोपीने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले होते. यामुळे दोघी प्रचंड घाबरल्या होत्या. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात आली. त्यांनी दोघींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नातेवाइकांनी शिक्षकाला घरी बोलावले. त्याआधी पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली होती.या प्रकरणाची अंबाझरी पोलिसांनी गंभीत दखल घेत ते पीडित विद्यार्थिनींच्या घरी पोहोचले. नराधम शिक्षक येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने या प्रकाराची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे.
अश्लील मेसेज पाठवून इंजिनीअर शिक्षकाने केली 'ही' मागणी
दरम्यान, अशीच एक घटना विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात घडली होती. विद्यार्थिनीला मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका इंजिनीअर शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधून तिला लग्नाचीही मागणी घातली होती. संदीप कुमार (वय-35, रा. लोहगाव,) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळ बिहारचा राहणारा आहे.
रस्ता खचल्यावर केलाय हा जुगाड; पाईपवरून जाणाऱ्या कारचा श्वास रोखायला लावणारा VIDEO VIRAL
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा