जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / घरबसल्या WhatsApp वर मिळवा खात्याची सगळी माहिती, या बँकांनी सुरू केलीय सेवा

घरबसल्या WhatsApp वर मिळवा खात्याची सगळी माहिती, या बँकांनी सुरू केलीय सेवा

घरबसल्या WhatsApp वर मिळवा खात्याची सगळी माहिती, या बँकांनी सुरू केलीय सेवा

आता तुमच्या खात्याची सगळी माहिती WhatsApp वर मिळणार, तुमचं या बँकेत खातं आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आता तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी बँकेत जाऊन रांग लावायची गरज नाही. ATM बाहेरही रांग लावयची गरच नाही. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आता तुमच्या एका क्लीकवर Whatsapp वर होणार आहे. बऱ्याच बँकांनी Whatsapp banking सेवा सुरू केली आहे. तुमच्या बँकेचं नाव या लिस्टमध्ये आहे का आताच चेक करा. बँक ऑफ महाराष्ट्रा- या बँकेनं घरबसल्या तुमच्या शंकाचं निरसन होणार आणि खात्याची सगळी माहिती मिळणार असल्याचं सांगितलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने एका Whatsapp नंबर दिला आहे. त्यावर तुम्हाला तुमच्या खात्यावरील रक्कम, काढलेले आणि भरलेले पैसे, चेक स्टेट्स अशा अनेक गोष्टींचे डिटेल्स पाहता येणार आहेत. 7066036640 या क्रमांकावर तुम्हाला मेसेज करायचा आहे. SBI - या बँकेनं देखील ग्राहकांच्या सोयीसाठी whatsapp बँकिंग सेवा सुरू केली आहे. 9022690226 या क्रमांकावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तिथे तुम्हाला HI टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला सेवेचा लाभ मिळेल.

News18

SBI ने ट्वीट करून ग्राहकांसाठी दिला मोठा अलर्ट

News18

HDFC Bank- सर्व ग्राहक 90+ सेवा आणि 24x7 या सेवेचा लाभ घेता येणार आहे. एचडीएफसी बँकेने व्हॉट्सअॅपवर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आणि सुरक्षित सेवा ऑफर आहे. ही ऑफर मात्र बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरच उपलब्ध असेल. 70700 22222 या क्रमांकावर तुम्हाला मेसेज करायचा आहे. तुम्ही ९० व्यवहारापर्यंत इथे ट्रान्झाक्शन हिस्ट्री चेक करू शकता.

भारतातील श्रीमंतांची ‘सेकंड होम’ म्हणून दुबईला पसंती; वाचा यामागचं कारण

ICICI Bank - या बँकेनं देखील Whatsapp बँकिंग सेवा सुरू केली आहे. 8640086400 या नंबरवर तुम्हाला hi पाठवायचं आहे. याशिवाय तुम्ही 9542000030 या नंबरवर SMS किंवा मिस्ड कॉलही देऊ शकता.

News18लोकमत
News18लोकमत

Axis Bank - या बँकेनं 24x7 सेवा देण्यासाठी 7036165000 हा नंबर जारी केला आहे. यावरून तुम्हाला hi मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला तुमच्या खात्यावरील रक्कम, शेवटचे ट्रान्झाक्शन, तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळू शकणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात