जाहिरात
मराठी बातम्या / मनी / भारतातील श्रीमंतांची 'सेकंड होम' म्हणून दुबईला पसंती; वाचा यामागचं कारण

भारतातील श्रीमंतांची 'सेकंड होम' म्हणून दुबईला पसंती; वाचा यामागचं कारण

भारतातील श्रीमंतांची 'सेकंड होम' म्हणून दुबईला पसंती; वाचा यामागचं कारण

भारतातील श्रीमंतांची 'सेकंड होम' म्हणून दुबईला पसंती; वाचा यामागचं कारण

प्रॉपर्टी कन्सल्टंट्सच्या मते, दुबईतील प्राइम रिअल इस्टेटच्या किमती गेल्या 12 महिन्यांत 89 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतीय कोट्यधीश दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी करत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 27 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी भारतीय बिझनेसमन मुकेश अंबानी यांनी दुबईतील पाम जुमेराहमध्ये एक बीच साइड व्हिला विकत घेतला. या व्हिलासाठी मुकेश अंबानींनी 163 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे एक हजार 350 कोटी रुपये मोजले आहेत. अंबानींच्या अगोदर अनेक भारतीय कोट्यधीशांनी दुबईमध्ये महागडी घरं विकत घेतली आहेत. एकूणच दुबई हे भारतातील श्रीमंतांचं आवडतं शहर होत आहे. भारतातील अनेक जण अब्जाधीश होताच दुबईत आपलं घर खरेदी करतात, असं चित्र गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं दिसत आहे. सध्या भारतीयांमध्ये दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्याची स्पर्धाच लागली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट्सच्या मते, दुबईतील प्राइम रिअल इस्टेटच्या किमती गेल्या 12 महिन्यांत 89 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतीय कोट्यधीश दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे किमतीही वाढल्या- वाढत्या मागणीमुळे, दुबईतील व्हिलाची किंमत 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. कन्सल्टंट्सच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, पाम जुमेराह, सेल एमिरेट्स हिल्स आणि जुमेराह बे आयलंडसारख्या अमेझॉन बोअरहुडच्या किमती वाढल्या आहेत. हेही वाचा: Personal Loan: प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे काय आहेत फायदे अन् ते कुणासाठी ठरू शकतं बेस्ट? वाचा तज्ज्ञांचं मत उदारमतवादी धोरणामुळे मोठं आकर्षण- दुबईतील सरकारची धोरणं उदारमतवादी आहेत. त्यामुळे अधिक परदेशी गुंतवणूकदार या शहराकडे आकर्षित होत आहेत. परिणामी, मालमत्तेची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अनेक श्रीमंत भारतीय दुबईला त्यांचं ‘सेकंड होम’ म्हणून प्रायॉरिटी देतात. या सर्व परिस्थितीमुळे त्यांना दुबईमध्ये सहज मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या सर्व गोष्टींचा फायदा दुबईला मिळत आहे. रिअल इस्टेट मार्केटचा फायदा- दुबईमध्ये घरं विकत घेतली जावीत, म्हणून प्राइम रेसिडेन्शिअल व्हॅल्यू लागू केलेली आहे. केवळ तिसर्‍या तिमाहीत येथे घरांच्या विक्रीमध्ये 29 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमती असलेल्या मालमत्तेच्या विक्रीनेदेखील नवीन उच्चांक गाठला आहे. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत, 152 अल्ट्रा-प्राइम घरांची विक्री झाली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दुबईमध्ये व्हिला विकत घेण्याच्या मागणीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 2023 आणि 2025 पर्यंत प्राइम रेसिडेन्शिअल एरियामध्ये आठ नवीन व्हिला ड्यु आहेत. डेव्हलपर्सनी अद्याप आपले नवीन प्रोजेक्ट मार्केटमध्ये आणलेले नाहीत. अल्प ते मध्यम कालावधीत, वर्षाच्या अखेरीस किमती पाच ते सात टक्क्यांपर्यंत वाढतील, अशी अपेक्षा आहे. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे 60 ते 80 टक्क्यांनी जास्त असेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: dubai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात