कोरोनावरील 'त्या' औषधावर बंदी आणा, अमोल कोल्हेंची केंद्राकडे मागणी

कोरोनावरील 'त्या' औषधावर बंदी आणा, अमोल कोल्हेंची केंद्राकडे मागणी

ही कंपनी चुकीचे दावे करीत असून त्यांना यापासून रोखावे अशी मागणी या पत्रात केली.

  • Share this:

मुंबई, 26 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर बाजारात वेगवेगळी औषध उपलब्ध झाली असून त्यामुळे गोंधळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी  फॅबीफ्लू नावाच्या औषधावर आक्षेप घेतला आहे. याबद्दल त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोरोनावर एक औषध बाजारात आणले आहे. या गोळीची किंमत ही 103 रुपये आहे. कोरोनातून मुक्त होण्यासाठी रुग्णाला या गोळ्याचे 14 दिवस सेवन करायचे आहे. 34 टॅबलेटची किंमतही

3,500 रुपये इतकी आहे. 14 दिवस कंपनीने गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या गोळ्यांचा खर्च हा 14 दिवसांमध्ये जवळपास 12 हजारांच्या घरात जातो, त्यामुळे हे औषध सर्वसामान्यांना न परवडणारे आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

'ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोविड-19 वर फॅबीफ्लू नावाचे औषध बाजारात आणले आहे. परंतु, या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे याची किंमत कमी करावी अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात नोकरी गेली, तरी झाला नाही हताश, इंजिनीअरनं सुरू केलं इडली सेंटर

त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी फॅबीफ्लू औषधावर संशय व्यक्त केला आहे. ही कंपनी चुकीचे दावे करीत असून त्यांना यापासून रोखावे अशी मागणी या पत्रात केली. ही कंपनी सदर औषध कोरोनासंक्रमित मधुमेहग्रस्त रुग्णांनाही लागू पडत असल्याचा व यावर केवळ हेच एक औषधच रामबाण असल्याचा दावा करीत आहे.

या कंपनीने सौम्य आणि मध्यम लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याचा दावा केला आहे. फक्त फॅबीफ्लू गोळीच नाहीतर इतरही औषध वापरली आहे, असंही अमोल कोल्हे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कंपनीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही कोल्हे यांनी केली.

संपादन - सचिन साळवे

First published: June 26, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading