जोहान्सबर्ग, 04 एप्रिल : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉक बाद होता-होता राहिला. पहिल्या वनडेमध्ये थोड्यात पराभवाचा सामना करावा लागलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ बरोबर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला.
वाचा - ICC World Cup 2011: अर्जुन आणि पृथ्वीने जवळ बसून पाहिली फायनल, Photo Viral
या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगायचं तर, दुसऱ्या वन डे सामन्यात केवळ नशिबाच्या जोरावर बचावला असं म्हणता येईल. क्विंटन डिकॉक आणि अॅडेन मार्करामने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्याच पॉवरप्लेमध्ये पाक गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. सलामीसाठी दोघांनी 55 धावांची भागिदारी केली. पण 10 व्या ओव्हरमध्ये मार्कराम बाद झाला. मात्र क्विटन डीकॉकनं दुसरी बाजू सांभाळली होती. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार द्यायला सुरुवात करत अर्धशकत पूर्ण केलं.
वाचा - मुंबई इंडियन्स 'या' 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार, अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी?
डिकॉक चांगली फलंदाजी करत डाव पुढं नेत होता मात्र 24 व्या ओव्हरमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानचा शादाब खान गोलंदाजी करत होता, तर डिकॉक फलंदाजी करत होता. त्यावेळी शादाबचा एक चेंडू डिकॉकच्या बॅटवर थेट न येता मिस झाला बॅटच्या मागे लागून थेट स्टंपवर गेला. बॉल स्टंपला लागला, त्यामुळं स्टंपमधील एलईडीही चमकले मात्र बेल्स पडले नाहीत. त्यामुळं क्रिकेटमधील नियमानुसार डिकॉक बाद होण्यापासून बचावला. आश्चर्यकारक रित्या डिकॉकला जीवदान मिळालं. मात्र डिकॉकला या जीवदानाचा फार फायदा उचलता आला नाही आणि तो काही वेळात 80 धावा करून बाद झाला.
— tony (@tony49901400) April 4, 2021
क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे असे म्हटले जाते. क्रिकेटमध्ये अनेक नियम आहेत आणि त्यात वेळोवेळी बदलही होत असतो. अशाच काही नियमांमुळे अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर असे प्रकार पाहायला मिळत असतात. पण अशा घटना क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाच्याही ठरू शकतात. कारण क्रिकेटध्ये प्रत्येक चेंडूवर सामना बदलण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Pakistan, South africa