मुंबई, 4 एप्रिल : टीम इंडियाने 2 एप्रिल 2011 रोजी श्रीलंकेचा वर्ल्ड कप फायनलमध्ये ( ICC World Cup 2011) पराभव केला होता. भारतीय टीम वर्ल्ड चॅम्पियन होऊन आता एक वर्ष झालं आहे. या निमित्तानं अनेक क्रिकेटपटूंनी त्या दिवसाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. क्रिकेटपटू आपल्या आठवणी सांगत असतानाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा फोटो वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या दोन मुलांचा फोटो आहे. हे दोघेही या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) वेगवेगळ्या टीमकडून खेळणार आहेत.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांचा हा फोटो असून हे दोघंही वानखेडे स्टेडियमवर जवळ बसून फायनल मॅचचा आनंद घेत आहेत. एका क्रिकेट फॅननं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. जो क्रिकेट फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या फोटोत अर्जुन तेंडुलकरनं मुंबई इंडियन्सची जर्सी आणि टोपी घातली आहे. तर त्याच्या शेजारीच पृथ्वी शॉ बसला आहे.
Was rewatching 2011 WC final and found this 😅 @PrithviShaw @RandomCricketP1 @ovshake42 @joybhattacharj @gauravkapur @bhogleharsha @CricCrazyJohns @cricbuzz @ESPNcricinfo @cricketworldcup @BCCI @ICC @DelhiCapitals pic.twitter.com/dl8nGhTtre
— Niranjan Nuthalapati (@Niranjan_N3) April 2, 2021
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा असलेला अर्जुननं यावर्षी मुंबईच्या वरिष्ठ टीमकडून पदार्पण केलं आहे. त्याचबरोबर त्याला मुंबई इंडियन्स टीमनं (Mumbai Indians) देखील करारबद्ध केलं आहे. त्याला या आयपीएल स्पर्धेत अंतिम 11 मध्ये संधी मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
( वाचा: IPL 2021: मुंबई इंडियन्स 'या' 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार, अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी? )
पृथ्वी शॉ गेल्या काही सिझनपासून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा सदस्य आहे. पृथ्वीनं नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. एका सिझनमध्ये 800 पेक्षा जास्त रन करण्याचा विक्रम पृथ्वीनं केला आहे. त्याने 8 मॅचमध्ये 165.40 च्या सरासरीनं 827 रन काढले. पृथ्वी शॉ च्या कॅप्टनसीमध्येच मुंबईनं फायनलमध्ये उत्तर प्रदेशचा 6 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, Cricket, IPL 2021, Prithvi Shaw, Viral photo