चेन्नई, 4 एप्रिल : जगातील सर्वात श्रीमंत टी20 लीग असलेल्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेला 9 तारखेपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेची पहिली लढत पाच वेळेसची चॅम्पियन (Mumbai Indians) आणि विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये खेळणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स यावर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे.
मुंबईच्या टीममध्ये कॅप्टन रोहित शर्मा, पॉवर हिटर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांच्यासह भेदक फास्ट बॉलर्सचा समावेश आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या मॅचमध्ये अंतिम 11 खेळाडू निवडताना मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला फार त्रास होणार नाही. कारण त्यांची टीम ही मागच्या सिझनपासून स्थिर आहे.
मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये रोहित शर्मा आणि क्विंटर डी कॉक हे ओपनर आहेत. त्यानंतर येणारे सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे आक्रमक बॅटींगसाठी प्रसिद्ध आहेत. या दोघांनीही इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या हे बंधू मुंबई इंडियन्सचे गेल्या काही वर्षांपासून आधारस्तंभ आहेत. त्यानंतर बॅटींगला येणाऱ्या कायरन पोलार्डमध्ये अगदी कमी बॉलमध्ये मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता आहे.
मुंबई इंडियन्सचा बॉलिंग अटॅकही मजबूत आहे. टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह मुंबईकडं आहे. लग्नानंतर तो पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट, कुल्टर नाईल हे फास्ट बॉलर मुंबईची शक्ती आहेत.
(वाचा : IPL 2021: कोरोनाची भीती वाढली! दोन खेळाडूंनी नाकारली धोनीच्या टीमची ऑफर )
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये त्याला यावर्षी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विशेषत: सुरुवातीच्या काही मॅचमध्ये त्याला बेंचवरच बसावं लागणार अशी दाट शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेट किपर), हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या. राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कुल्टर नाईल/एडम मिल्ने
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, Cricket, IPL 2021, Mumbai Indians