मुंबई, 30 जुलै: राज्यात यंदा बकरी ईदच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदाच्या बकरी ईदआधी राजकारणीही चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बकऱ्यांच्या खरेदीवरून राज्यातलं राजकारण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे मंत्री खोटं बोलत असून मुस्लीम समाजाला मूर्ख बनवत असल्याचा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी केला आहे. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनामुळे बकरी खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन बकरी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावरून आता चांगलाच मुद्दा तापला आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी कुर्बानीसाठी ऑनलाइन बकरा खरेदी करण्याचं मुस्लीम बांधवांना आवाहन केलं होतं. या मुद्द्यावरून आता भाजप नेते खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी जोरदार टीका केली आहे. हे वाचा- UNLOCK 3.0 मध्ये तुम्ही करू शकणार नाहीत ही कामं, 31 ऑगस्टपर्यंत बंदी कायम! नवाब मलिक आणि अस्लम शेख यावं स्वत: तरी ऑनलाइन बकरे खरेदी केले आहेत का? कुर्बानीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची शहानिशा ऑनलाइन कशी केली जाणार? याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बकऱ्याच्या कुर्बानीविषयी कोणतीही माहिती न देता परस्पर निर्णय घेतला जात असल्याचा आरोपही हाजी अराफात यांनी केला. ऑनलाइन बकरा खरेदी निर्णय घेताना खाटीक समाजाला विश्वासात घेतलं नाही. ही सरळ मुस्लीम बांधवांची फसवणूक आहे. अशी टीकाही भाजप नेत्यानं अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.