अयोध्या 04 ऑगस्ट: अयोध्येत राम जन्मभूमी स्थानावर भव्य राम मंदिर उभारण्याचं काम सुरु होत आहे. तर अयोध्येपासून 3 किमी अंतरावर असलेल्या एका खेड्यात रामाची जगातली सर्वात उंच मूर्ती उभारण्यात येत आहे. 251 मिटर उंच मूर्ती असून एका स्तंभावर ती उभारली जाणार आहे. त्यामुळे त्याची पूर्ण उंची ही तब्बल 301 मिटर एवढी असणार आहे.
चीनमध्ये असलेला गोतम बुद्धांचा पुतळा हा 208 मिटर आहे. तर गुजरातमधला सरदार पटेलांचा पुतळा हा 182 मिटर उंच आहे. त्या सर्वांपेक्षा रामाच्या या मूर्तीची उंची जास्त राहणार आहे.
अयोध्येजवळ असणाऱ्या मंजाबारेथा या छोट्या गावात हा प्रकल्प साकारला जात आहे. हा पुतळा आणि त्याचा सर्व आराखडा हा पूर्णपणे स्वदेशी असून पुतळ्याचं कामही तिथेच करण्यात येणार आहे. शरयू नदीच्या काठावर ही मूर्ती उभी राहणार आहे.
दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली अयोध्या, PHOTOS पाहून बसणार नाही विश्वास
50 मिटर उंचीच्या स्तंभावर ही कोदंडधारी रामाची प्रतिमा उभीराहणार असून ती सुरक्षीत राहिल यासाठी खास टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. तर स्तंभामध्ये एक संग्रहालय तयार होणार आहे.
फक्त 400 घराचं हे खेडं असून हा प्रकल्प उभा राहात असल्याने या लोकांचं आयुष्यच बदलून जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.