Lockdownमुळे घरी पोहोचू शकला नाही पती, रागाच्या भरात पत्नीने घेतलं विष

Lockdownमुळे घरी पोहोचू शकला नाही पती, रागाच्या भरात पत्नीने घेतलं विष

महिलेची पतीने तातडीने घरी यावं अशी मागणी होती. त्यासाठी तिने हट्टच धरला होता.

  • Share this:

लखनऊ 9 जून:  लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांचे हाल झाले. त्यांच्या करुण कहाण्यांनी सर्व देश हादरुन गेला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. बांदा जिल्ह्यातल्या एका खेड्यात महिलेने आत्महत्या केली. त्याचं कारण जेव्हा कळालं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. पती लवकर घरी पोहोचू न शकल्यामुळे पत्नीने रागाच्या भरात विष घेतलं. त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

पीडीत महिलेचा नवरा विदेशात ड्रायव्हरचं काम करत होता. लॉकजाऊनमुळे भारतात येण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने तो काही गेली काही महिने येऊ शकला नाही. तर महिलेची पतीने तातडीने घरी यावं अशी मागणी होती.  त्यासाठी तिने हट्टच धरला होता. मात्र कुठलंही कारण समजून घ्यायला ती तयार नव्हती. त्यामुळे तिने रागाच्या भरात विष घेतलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलीस  विविध अंगाने तपास करत आहेत. महिलेने इतर कुठल्या कारणांनी आत्महत्या केली का याचाही तपास पोलीस घेत आहेत. महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचार करण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

पालघर साधू हत्याकांड: CID चौकशीनंतर जंगलात गेलेला तरुण घरी परतलाच नाही

पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या

First published: June 9, 2020, 11:43 PM IST

ताज्या बातम्या