जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भयावह अपघात! एकाच कुटुंबातील 6 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू, लहान बाळासह अनेकजण अडकले

भयावह अपघात! एकाच कुटुंबातील 6 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू, लहान बाळासह अनेकजण अडकले

भयावह अपघात! एकाच कुटुंबातील 6 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू, लहान बाळासह अनेकजण अडकले

घराला आग आगल्यामुळे तब्बल 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ग्वाल्हेर, (मध्य प्रदेश)18 मे : देशात कोरोनाचा हाहाकार माजला असताना आगीची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्वाल्हेरच्या इंदरगंज इथे एका घराला भीषण आग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराला आग आगल्यामुळे तब्बल 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंबाचा आगीमध्ये मृत्यू झाल्याच्या बातमीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात अचानक आग ही लागली. लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात होते. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे यामध्ये 3 मुले आणि 3 महिलांचा होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आलं. प्रशासनाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं पण तोपर्यंत कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. लॉकडाउन 4.0मध्ये देशात 12 तास असणार कर्फ्यू, अशा आहेत नव्या अटी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरातून सहा मृतदेह बाहेर काढले. जिल्हाधिकारी एसपी माजी आमदारासह मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी उपस्थित होते. अज्ञात कारणास्तव पेंट शॉपमध्ये ही आग लागली आहे. इथेच मृत कुटुंब राहत होतं. अग्निशमन दलाने घटनास्थळ आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दुकानाच्या वरच्या मजल्यावरील निरागस मुलासह एक कुटुंब घरात अडकलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पोलीस दलाने कुटुंबियांना बचावासाठी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील सहा जण अशा प्रकारे गेल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचं अद्यार कारण समजू शकलेलं नाही. काही तासांतच AMPHAN चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, ओडिशा आणि बंगाल हाय अलर्टवर पोलिसांनी घटनास्थळावरून 6 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर अद्यापही मदतकार्य सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात