पंढरपुरातील विठ्ठल आणि रुख्मिणी अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे. तब्बल 2 वर्षांनंतर आषाढी वारी निघत आहे. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. हरिनामाच्या गजरात पंढरपुरच्या दिशेने हजारो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचा आषाढी एकादशी हा दिवस (10 जुलै) अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. चला तर विठू माऊलीचं दर्शन घेऊया आणि एकमेकांनी आषाढी एकादशीच्या अभंगरुपी खास शुभेच्छा देऊया...
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||
टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || 1 ||
इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || 2 ||
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || 3 ||
घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || 1 ||
डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || 2 ||
तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || 3 ||
मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || 4 ||
तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || 5 ||
माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला || धृ ||
वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया || 1 ||
गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे || 2 ||
तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा || 3 ||
संत जनाई ओवी गाई, विठाई ग विठाई
माझी पंढरीची आई, कशी सखू अन बहिणाबाई
विठाई ग विठाई, माझी पंढरीची आई,
रखुमाई मंदिरी ऐकली परी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wari