लंडन, 08 मे : आतापर्यंत असे मानले जात होते की कोरोना शारीरिक संबंधामुळे पसरतो. मात्र आता शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे की, कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते. पुरुषांच्या स्पर्ममध्ये शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरस सापडला आहे. त्यामुळे चीनमध्ये निरोगी रुग्णांनाही शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. चीनच्या शांगक्यू या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 38 पुरुषांना कोरोनाही लक्षणे नव्हती. यांपैकी 6 जणांच्या स्पर्ममध्ये कोरोनाव्हायरस आढळून आला. या 6 रुग्णांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते निरोगी झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या स्पर्ममध्ये पुन्हा कोरोना आढळून आला. दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. चीनमधील तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, कोरोना संक्रमित पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर व्हायरस पसरण्याचा धोका असू शकतो. तुम्हाला कोरोनापासून वाचवणारा साबण 4500 वर्षांपूर्वीच असा तयार झाला रॉयटर्सनं याबाबतचा जामा नेटवर्क ओपन यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे, यात चीनमधील शास्त्रज्ञांनी, अद्याप आम्हाला याबाबत ठोस पुरावे मिळाले नाही आहेत. मात्र काहींच्या स्पर्ममध्ये कोरोना असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आणखी काही रुग्णांची तपासणी आम्ही करणार आहोत. असे असू शकते की भविष्यात कोरोना सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये (STD) येऊ शकतो. ब्रिटनच्या शेफील्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अॅलन पैसी यांनी, आतापर्यंत या अभ्यासाबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहे. मात्र ही शक्यता नाकारता येत नाही. आम्हीही शोध घेत आहोत की स्पर्ममध्ये किती प्रमाणात कोरोना आहे, याचा शोध घेत आहोत. तसेच, स्पर्ममध्ये किती काळ कोरोना सक्रीय राहू शकता, त्याचे परिणाम यांचा अभ्यास सुरु आहे. तर, बेलफास्टच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या प्रजनन औषधांचे अभ्यासक शीना लुईस म्हणाल्या की, हा खूप अभ्यास अपूर्ण आहे. आता यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. दरम्यान, शीना लुईस यांनी पुरुषांच्या स्पर्ममध्ये विषाणूचा धोका असू शकतो असेही त्या म्हणाल्या. WHO दिली होती ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज नाही. तरी शारीरिक संबंध ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची (Coronavirus) सौम्य लक्षणंही असतील तरी तुम्हाच्या जोडीदाराला त्याची लागण होऊ शकते. याबाबत बीबीसीने लंडनमधील डॉक्टर एलेक्स जॉर्ज यांच्याकडून माहिती घेतली. फळं आणि भाजी खरेदीला जाताय, काळजी घ्या…नाहीतर घरी कोरोनालाही आणाल डॉ. जॉर्ज यांनी सांगितलं की, “जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसह आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल आणि सारख्या परिस्थितीत असाल तर तुम्हाला काही बदल करण्याची गरज नाही. मात्र जर दोघांपैकी एकामध्येही कोरोनाची लक्षणं दिसली तर एकमेकांपासून दूर राहावं, दोघांमध्ये किमान 2 मीटर अंतर ठेवावं आणि स्वत:ला घरातच एका ठिकाणी आयसोलेट करून घ्यावं.”. त्यामुळे सेक्समुळे कोरोना पसरतो का, याबाबत अजूनही काही ठोस पुरावे नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.