एअर इंडियाचं होणार खाजगीकरण, सरकारने केली विकण्याची तयारी

एअर इंडियाचं होणार खाजगीकरण, सरकारने केली विकण्याची तयारी

एअर इंडिया बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करतेय. सरकारी ऑइल कंपन्यांचं बिल भरलं नाही म्हणून HPCL, BPCL ने एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा करणंही थांबवलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनीच हे जाहीर केलं. एअर इंडिया चालवण्याची आता सरकारची तयारी नाही. त्यामुळेच या एअरलाइन्सचे 100 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एअर इंडिया बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करतेय. सरकारी ऑइल कंपन्यांचं बिल भरलं नाही म्हणून HPCL, BPCL ने एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा करणंही थांबवलं होतं.

एअर इंडियाच्या खाजगाकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असं नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हेच एअर इंडियाच्या खाजगीकरणीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. याआधी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आहे.

पगार मिळायला उशीर

एअर इंडियावरच्या कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. या एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर एक महिन्यात 300 कोटी रुपये खर्च होतात. मे महिन्यामध्ये तर कर्मचाऱ्यांना 10 दिवस उशिरा पगार मिळाला होता.

2017 - 2018 च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2018-19 या आर्थिक वर्षात एअर इंडियाचं कर्ज 55 हजार कोटींवरून वाढत जाऊन 58 हजार 351 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झालं होतं.

पाकिस्तानात हाहाकार! इथले सोन्याचे भाव पाहून तुमचे डोळे होतील पांढरे

विमानासाठी लागणारं इंधन GST च्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याबद्दल अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव देण्यात येईल, असंही नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितलं.

एअरलाइन कंपन्या आर्थिक संकटात आहेत. अलीकडेच जेट एअरलाइन्स दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे एअर इंडियाचं वेळीच खाजगीकरण केलं नाही तर या एअरलाइनवरही मोठं संकट येऊ शकतं.

=======================================================================================================

VIDEO : राष्ट्रवादीला सेनेचा दे धक्का, अवधूत तटकरे पोहोचले 'मातोश्री'वर, म्हणाले....

First published: August 29, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading