• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Big News: देशभरात न्यूमोनिया प्रतिंबंधक लसीकरणाला सुरुवात; ही आहेत वैशिष्ट्यं

Big News: देशभरात न्यूमोनिया प्रतिंबंधक लसीकरणाला सुरुवात; ही आहेत वैशिष्ट्यं

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी देशव्यापी न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणाला (Anti Pneumonia vaccination begins in the country) सुरुवात झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी देशव्यापी न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणाला (Anti Pneumonia vaccination begins in the country) सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी या (Union health minister Mansukh Mandavia) योजनेचं औपचारिक उद्घाटन केलं. या योजनेचा देशातील लहान मुलांना फायदा होणार असून न्यूमोनियामुळं दरवर्षी (Death rate to reduce by 60 percent) होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 60 टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काय आहे योजना? युनिव्हर्सल इम्युनायजेशन प्रोग्राम अंतर्गत न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन अर्थात पीसीव्ही या योजनेला देशभरात सुरुवात झाली आहे. कॉन्जुगेट लस ही दोन वेगवेगळ्या घटकांचा वापर करत तयार करण्यात आली आहे. 28 डिसेंबर 2020 रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या काळात या योजनेची तयारी सुरू झाली होती. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियांशी लढण्यासाठी या लसीचा उपयोग होणार आहे. फुफ्फुसावर हल्ला करणाऱ्या विषाणूंपासून शरीराचं रक्षण करण्याचं काम ही लस करणार आहे. यामध्ये कानाचं इन्फेक्शन, सायनस, डोकेदुखी, रक्ताचं संक्रमण यासारख्या गंभीर आणि वेदनादायक आजारांपासूनदेखील दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरवर्षी होतात लाखो मृत्यू न्यूमोनियामुळे दरवर्षी देशात पाच वर्षांखालील 67 हजार 800 मुलांचा बळी जातो. नवी लस घेतल्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे वाचा- शरीरावर एक मॅजिक नंबर लिहिताच छुमंतर होते कोणतीही समस्या; तरुणाचा विचित्र उपाय कर्मचाऱ्यांचे आभार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व लसीकरण कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वांसाठी मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून कोट्यवधी भारतीयांपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसी पोहोचत आहेत. त्यापाठोपाठ आता निमोनिया प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रमदेखील यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पूर्ण देशभरात आता ही लस आपातकालीन वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  Published by:desk news
  First published: