Home /News /news /

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारची आणखी एक कारवाई

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारची आणखी एक कारवाई

पालघर, 29 एप्रिल : लॉकडाउनमध्ये गुजरातला जात असताना चोर समजून दोन साधू आणि चालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 101 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी घटनास्थळावर उपस्थितीत असलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. 16 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील गडचिंचले भागात दोन साधु व त्यांच्या वाहनचालकाच्या हत्या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा - 'मला मृत्यू केव्हाही कवटाळू शकतो', 2018 मध्ये इरफान खानने केलं होतं वक्तव्य सुरतकडे आडमार्गाने निघालेल्या या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थांनी चोर समजून अमानुषपणे हत्या केली होती. याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवल्याबाबत कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच उपनिरीक्षकाला त्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एक सहाय्यक फौजदार आणि दोन हवालदार यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या पोलीस स्टेशन मधील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती.  सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग करीत असून सुमारे 400 ते 500 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. काय आहे प्रकरण? पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे गुजरातकडे चालले होते. पण, गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ही गाडी 15 मिनिटाने मागे आली. गाडी जशी मागे आली तेव्हा तिथे अचानक लोकं जमा झाले. जवळपास हजार लोकं होती. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली. हेही वाचा - फक्त पत्नीसाठी पुन्हा इरफानला जगायचं होतं, व्यक्त केली होती इच्छा दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गडचिंचले येथे तिघांची हत्या केली. या  प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Palghar

पुढील बातम्या