मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

फक्त पत्नीसाठी पुन्हा इरफानला जगायचं होतं, व्यक्त केली होती इच्छा

फक्त पत्नीसाठी पुन्हा इरफानला जगायचं होतं, व्यक्त केली होती इच्छा

Actor Irrfan Khan Death News:  "मी सुतापाबद्दल काय बोलू? ती सात दिवस 24 तास माझ्यासोबत होती. माझी काळजी घेतली आणि तिने मला खूप मदत केली"

Actor Irrfan Khan Death News: "मी सुतापाबद्दल काय बोलू? ती सात दिवस 24 तास माझ्यासोबत होती. माझी काळजी घेतली आणि तिने मला खूप मदत केली"

Actor Irrfan Khan Death News: "मी सुतापाबद्दल काय बोलू? ती सात दिवस 24 तास माझ्यासोबत होती. माझी काळजी घेतली आणि तिने मला खूप मदत केली"

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 29 एप्रिल : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले आहे. 54 वर्षांता इरफान गेले काही काळ न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरशी दोन हात करत होते. मात्र अचानक त्याची तब्येत बिघडल्यानंतर इरफान यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक तास आयुष्य आणि मृत्यूसाठी संघर्ष केल्यानंतर बुधवारी 29 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरविरुद्ध लढाई जिंकण्याची इच्छा व्यक्त करताना इमरान यांनी एका मुलाखतीत आपल्या पत्नीसाठी जिवंत राहायचे आहे, असे सांगितले होते.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत इरफान खान म्हणाले की, "माझ्यासाठी हा काळ एखाद्या रोलर-कोस्टर राइड सारखा होता, ज्यामध्ये आम्ही थोडे रडलो पण जास्त हसलो. माझी अवस्था खूपच भयंकर होती. पण स्वत:वर नियंत्रण मिळवलं. असं वाटत होतं की कोणी तरी माझ्यासोबत हॉपस्कॉच खेळत आहे". यावर्षी इऱफानचा अंग्रेजी मिडियम हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यावेळी चाहत्यांसह सर्वांनी इरफानचे कौतुक केले होते.

दरम्यान या मुलाखतीत इरफाननं आपल्या पत्नीचे विशेष कौतुक केले. इरफान म्हणाले की, "हा काळ फक्त माझ्या प्रियजनांसाठी जगलो. मी माझ्या मुलांबरोबर बराच वेळ घालवला. त्यांना वाढत असलेले पाहिले. किशोरवयीन मुलांसाठी हा अतिशय महत्वाचा काळ आहे". तर, पत्नी सुतापा सिकंदर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, "मी सुतापाबद्दल काय बोलू? ती सात दिवस 24 तास माझ्यासोबत होती. माझी काळजी घेतली आणि तिने मला मला खूप मदत केली. मला जर जगण्याची संधी मिळाली तर मी फक्त तिच्यासाठी जगेन". हाय ग्रेड न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाशी झुंज देत होता.

'पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला' इरफानचे वडील असं म्हणण्यामागे काय होतं कारण

तीन दिवसांपूर्वी इरफान यांच्या आईच्या मृत्यूची बातमी आली आणि तातडीने इरफानची प्रकृती चिंताजनक होण्यासाठी चर्चा सुरू झाली. इरफानच्या रूपाने इंडस्ट्रीने एक महान व्यक्ती आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेता गमावला आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीपासून त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना हादरवून सोडले आहे. 2018 साली त्यांना आपल्या या कॅन्सर आजाराविषयी कळलं होतं. त्यांनी या संदर्भात स्वत: आपल्या फॅन्सना सोशल मीडियावरून माहिती दिली होती. त्यानंतर लंडनमध्ये रुग्णालयात उपचार घेऊन 2019 साली भारतात पुन्हा आले.

इरफानच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन भावूक, सोशल मीडियावर केली ही पोस्ट शेअर

इरफान खान यांना न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला होता.दर्जेदार अभिनयाने भूमिकांना वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारे आज काळाच्या पडद्याआड झाले आहेत. बॉलिवूडमधील आणखी एक तारा निखळल्यानं शोककळा पसरली आहे.

First published: