मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Ananya movie trailer: काय ती स्माईल, काय ती जिद्द सगळं ओक्के मध्ये; अनन्याचा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

Ananya movie trailer: काय ती स्माईल, काय ती जिद्द सगळं ओक्के मध्ये; अनन्याचा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

 इंद्रजींची दिपू सध्या एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध होत आहे. तिच्या बहुचर्चित अनन्या (Ananya marathi movie trailer) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून हृताचा एकूण अंदाज बघून तिच्या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण होत आहे.

इंद्रजींची दिपू सध्या एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध होत आहे. तिच्या बहुचर्चित अनन्या (Ananya marathi movie trailer) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून हृताचा एकूण अंदाज बघून तिच्या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण होत आहे.

इंद्रजींची दिपू सध्या एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध होत आहे. तिच्या बहुचर्चित अनन्या (Ananya marathi movie trailer) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून हृताचा एकूण अंदाज बघून तिच्या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण होत आहे.

मुंबई 27 जून: अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या सातव्या आसमानावर आहे. हृताच्या आयुष्यात एकामागे एक सुखद धक्के बसताना दिसत आहे. आता तिच्या आनंदात भर पडणारी अजून एक कोरीकरकरीत आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे. अखेर तिच्या बहुचर्चित सिनेमा ‘अनन्या’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अत्यंत अप्रतिम पद्धतीने केलेल्या ट्रेलरला बरीच पसंती मिळत आहे. स्वतःच्या जिद्दीवर एखादी मुलगी अपघाताचा सामना कशी करते याच मूर्तिमंत उदाहरण या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कोणताही अडथळा आला तरी स्वप्नांच्या आकाशात स्वच्छंदी भरारी घेणारी ही अनन्या देशमुख पाहायला आता प्रेक्षक बरेच उत्सुक झाले आहेत.

हृता दुर्गुळे हे नाव आता अभिनय क्षेत्रात नवं राहिलेलं नाही. हृता तिच्या अभिनयामध्ये सध्या विविधता आणायचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या हृता दुर्गुळेचा नवा चित्रपट ‘अनन्या’ (Ananya marathi movie) लवकरच चित्रपटगृहात भेटीला येणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता अनन्या या चित्रपटाचा ट्रेलर (Ananya movie trailer) आज रिलीज झाला आहे ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. ‘अनन्या’ हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय असणारा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा ट्रेलर सुद्धा उत्कंठा वाढवून ठेवत आहे. हा ट्रेलर पाहून दुःखात असणाऱ्या अनेकांना उभारी मिळताना दिसत आहे. एका सामान्य मुलीची इन्स्पिरेशनल आणि असामान्य बनण्याची कथा दाखवणारा हा ट्रेलर किंचित डोळे पाणवणारा सुद्धा आहे. अपघातासारख्या प्रसंगातून हात निकामी झाल्यावर सुद्धा स्वतःला बाहेर काढत जगणाऱ्या अनन्याला पाहायला सगळेच आतुर झाले आहेत. आजवर फक्त हृताचा आवाज आणि पुसटशी ओळख देणारा एक टीजर प्रदर्शित झाला होता.

आणि त्यानंतर चित्रपटाची थोडी पार्शवभूमी देणारा सुद्धा एक टीजर नुकताच येऊन गेला. मात्र या नव्याकोऱ्या ट्रेलरमध्ये अपघातानंतर अनन्याच्या आयुष्यात नेमकं काय घडणार ही उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये हृता एकदम कमाल आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हृता एकाच वेळी सध्या विविधांगी भूमिकांमध्ये दिसत आहे.

हे ही वाचा- प्रार्थनानं शेअर केले तिचे सगळ्यात आवडते PHOTO! हॉट लुक पाहून चाहते पडले प्रेमात

‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटका मधील मन्या, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील दिपू तर आता ‘अनन्या’ चित्रपटातील अनन्या देशमुख हे पात्र अशा एकाहून एक सरस भूमिका निभावताना ती दिसत आहे. हृताने स्वतःच्या सोशल मीडियावरून सुद्धा हा ट्रेलर पोस्ट केला असून तिला कधीच न पहिल्या अवतारात प्रेक्षक बघून तिचं कौतुक करताना दिसत आहेत. या वेगळ्या भूमिकेचं आणि हृताच्या अभिनय कौशल्याचं बरंच कौतुक होत आहे. हृता येत्या काळात ‘टाईमपास 3’ चित्रपटात सुद्धा एका डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. हृता सध्या बरीच चर्चेत आहे.कारण आहे तिची मालिका, तिचे येऊ घातलेले सिनेमे. आधी (Hruta Durgule marriage) लग्न मग हनिमून आणि लागोपाठ झालेल्या चित्रपटांच्या घोषणांमुळे हृता सध्या प्रचंड आनंदात आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Movie release, Trailer, Upcoming movie