मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात कार शिरली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात कार शिरली

या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार शिरल्याने खळबळ उडाली.

मुंबई, 14 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यात अचानक एक अज्ञात कार शिरल्याची (An unidentified car entered in convoy of CM) धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईत ही घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक गाडी शिरल्याने एकच खळबळ उडाली. ही एक आलिशान कार असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहविभागासोबतची बैठक संपवून आपल्या घराकडे निघाले होते. त्याच दरम्यान एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली. ही गाडी मर्सिडिज कार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित मर्सिडिज कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा कार ताफ्यात अज्ञात वाहन अचानक घुसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी त्यांच्या कारच्या मागेपुढे सुरक्षा कारचा ताफाही चालतो. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपवून वर्षा निवास्थानी परत येत असताना ही घटना घडली.

अखेर राज ठाकरेंचा 'हा' मुद्दा पटला अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

मलबार हिल दरम्यान एक मर्सिडिज बेंझ कार मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात शिरली आणि कारचा चालक वेगाने कार चालवत होता. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी वेगाने जाणारी कार थांबवली आणि चौकशी केली असता कार चालक मोठा व्यापारी आहे आणि मलबार हिल परीसरातच राहतो.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 279 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 179 आणि 177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जिममधून त्याच्या घराकडे जात होता आणि कानाला ईअरफोन लावला होता, त्यामुळे त्याची कार कुठे आणि कुणासोबत जात होती हे त्याला माहित नव्हते. निष्काळजीपणे वाहन चालवल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपीला जामीनही मिळाला आहे.

First published:

Tags: Uddhav thackeray