Home /News /news /

पालघर प्रकरणावर अमित शहांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...

पालघर प्रकरणावर अमित शहांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...

अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या पालघर हत्याकांडामुळे राजकीय वातावरणही तापायला लागले आहे.

    दिल्ली, 20 एप्रिल : अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या  पालघर हत्याकांडामुळे राजकीय वातावरणही तापायला लागले आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलून 100 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून माहिती घेतली आहे. पालघरमध्ये 2 साधूंची जमावाने दगडाने ठेचून हत्या प्रकरणावरून देशभरात पडसाद उमटत आहे. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल  महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे. हेही वाचा - हे डॉक्टर कधीपासून झाले? शिवसेनेनं फडणवीसांना फटकारलं दरम्यान, पालघर प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त केली आहे.  पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिला. 'या घटनेचे कुणीही राजकारण करू नये' तर दुसरीकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुदद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पालघर येथील घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी असून या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अकोल्यात पत्रकार परिषदमध्ये केलं. हेही वाचा -पोलीस इन्स्पेक्टरने मुलांना घातल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, दोन सुनाही जखमी पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन साधूंचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गुरुवारी रात्री गडचिंचले येथे तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखलील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करत आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या