जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Weather update : राज्यातील 12 जिल्ह्याना IMD कडून alert, पुणे, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Weather update : राज्यातील 12 जिल्ह्याना IMD कडून alert, पुणे, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Weather update : राज्यातील 12 जिल्ह्याना IMD कडून alert, पुणे, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

(Weather update) भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मे : राज्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. (Weather update) भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. (alert) 19 ते 21 मे या कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट (heat wave) येण्याची शक्यता आहे.

जाहिरात

दरम्यान नांदेड जिल्ह्यात आज  मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने झोडपले, नांदेड शहरासह हदगाव, भोकर,अर्धापूर, हिमायतनगर यासह  काही ठिकाणी पाऊस पडल्याने वातावरण थंड झाले आहे. मान्सून पूर्व पडलेल्या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे.

हे ही वाचा :  जयमाळा घातल्यानंतर भर मंडपात तमाशा, वऱ्हाडी परताच वधूनं उचललं टोकाचं पाऊल

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान वर्धा शहरात काल सर्वाधिक उष्ण तापमान ४५ अंश सेल्सिअस होते.

दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे.

हे ही वाचा :  Anand Remake: ‘पुन्हा पडद्यावर घुमणार बाबूमोशायाचं नाव’, राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक

जाहिरात

राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.

मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात