Home /News /national /

जयमाळा घातल्यानंतर भर मंडपात तमाशा, वऱ्हाडी परताच वधूनं उचललं टोकाचं पाऊल

जयमाळा घातल्यानंतर भर मंडपात तमाशा, वऱ्हाडी परताच वधूनं उचललं टोकाचं पाऊल

पसंतीची बाईक न मिळाल्याने संतापलेल्या वराने जयमाला घातल्यानंतर लग्नास नकार देत भर मंडपातून परतला.

    लखनऊ, 19 मे: लखनऊमध्ये (Lucknow) धक्कादायक प्रकार घडला आहे. पसंतीची बाईक न मिळाल्याने संतापलेल्या वराने जयमाला घातल्यानंतर लग्नास नकार देत भर मंडपातून परतला. याच गोष्टीचा राग आल्यानं नववधूने आत्महत्या (Committed Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या तयारीबाबत दोन दिवसांपूर्वीपर्यंत गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्याचवेळी नववधूच्या आत्महत्येमुळे (bride's suicide) शोककळा पसरली आहे. प्रत्येक जण याचीच चर्चा करत आहे. माळ येथील नारायणपूर गहदो येथील अमित यांची मुलगी संध्या हिचा विवाह असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. नौबस्ता सालेहनगर येथील रहिवासी ठाकुरदीन यांचा मुलगा अमर बहादूर याच्याशी संध्याचा विवाह होत होता. लग्नात कोणतीही कमतरता राहू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली. वराची हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण झाली. पण गरीब आर्थिक परिस्थितीमुळे विनंती केलेल्या Apache बाईकऐवजी Splendor विकत घेण्यात आली. रविवारी 15 मे रोजी वरात दारात पोहोचली. साडेसहा वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात झाडली गोळी, मरणानंतर 5 जणांना दिलं जीवदान वरातीचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. वर आणि त्याचे मित्र नाचत-गात स्टेजवर पोहोचले. तिथे हार घालण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर वर स्टेजवरून खाली उतरताच त्याची नजर हुंड्यात सापडलेल्या बाईकवर गेली. त्यानंतर तो संतापला आणि त्यानं लग्नाला नकार दिला. वधू पक्षाचे लोकही या सोहळ्यात सहभागी झाले होते, मात्र नवरा मुलगा अचानक उठून नातेवाईकांसह मंडप सोडून निघून गेला. मुलाकडून कमी दागिनं आल्यानं मुलीच्या घरच्यांनी त्यांना चांगले-वाईट म्हटलं होतं, असंही गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त होऊन वरात परतली. जिथे बाईकसाठी वरानं गोंधळ घातला होता. त्याचवेळी मंडपात कार्यक्रम सुरू होताच घरातील महिलांनी दागिने पाहून नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून बराच वेळ दोन्ही पक्षांत वाद सुरू होता. याचा राग आल्याने वर आणि त्याचे जवळचे नातेवाईक तेथून निघून गेले. वराच्या बाजूने वधूला दागिने द्यायचे नव्हते. ही बाईक केवळ निमित्त असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनं हादरलेल्या नववधू संध्यानं सोमवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून घेतला. अज्ञात कारणामुळे तिनं आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. एसएचओ माल रवींद्र कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी कोणावरही आरोप केलेला नाही. खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे. संध्याची आई शांती यांनी सांगितले की, आम्ही खूप अस्वस्थ आहोत. आपण कोणावरही आरोप करू नये.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bride, Bridegroom, Uttar pradesh news

    पुढील बातम्या