मुंबई 30 जून: बुधवारी पहाटे सिने दिग्दर्शक आणि अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) चे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं आकस्मित निधन झालं. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पतीच्या अचानक जाण्याने अभिनेत्री मंदिरालाही मोठा धक्का बसला आहे. पतीच्या अंत्यसंस्कारावेळी मंदिराला दुःख अनावर झालं होत. आप्तस्वकीयांच्या गळ्यात पडून ती रडत होती. मुंबईत राज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Mandira Bedi broke down)
राज हे स्टंट दिग्दर्शक तसेच चित्रपट निर्माते ही होते. काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. बुधवारी सकाळी 4:30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. (Filmmaker Raj Kaushal death)
मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा तर एक मुलगी. त्यांच्या मुलाचं जन्म 2011 साली झाला होता. तर मुलगी त्यांनी दत्तक घेतली होती. त्यांचं आपल्या कुटुंबावर फार प्रेम होतं. नेहमी ते कुटुंबासोबत, मुलांसोबत वेळ घालवताना दिसायचे.
राज यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून (film Industry) त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केलं आहे.
चक्क विवियन रिचर्डला आशा भोसले म्हणाल्या होत्या ‘नाना पाटेकर’; अशी होती नीना गुप्ता यांची रिअॅक्शनयाशिवाय दोनच दिवसांपूर्वी ते आनंदी तसेच पार्टी करतानाही दिसले होते. ज्यात त्यांची पत्नी मंदिरा बेदी, मित्र झहीर खान, सागरिका घाटगे, अंगद बेदी, नेहा धुपिया हे सेलिब्रिटी ही घरी पार्टीला उपस्थित होते. सोशल मीडियावर ते अनेक फोटो शेअर करायचे. त्यांच्या पोस्ट्स मध्ये ते नेहमी आनंदी असल्याचं पाहायला मिळायचं. तसेच कुटुंबासोबत, पत्नी सोबत फोटोही शेअर करायचे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वच थरातून हळहळ व्यक्त होत आहे.