पुणे, 29 मे : जुन्नर इथल्या विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यावर जुन्नर पोलिसात मारहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी अक्षय बोऱ्हाडे या युवकाला बंगल्यावर बोलावून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक इथे अनधिकृतपणे मनोरुग्णांची संस्था चालवत असलेल्या अक्षय मोहन बोऱ्हाडे या तरुणाने केला आहे. त्यासंबंधी त्याने एक फेसबूक लाईव्हसुद्धा केलं होतं. पण एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे.
याबाबत अक्षय बोऱ्हाडे याने सोशल मीडियावर फेसबूक लाईव्हवर यासंबंधी आरोप केला होता. आपण समाजासाठी काम करत असताना पैशासाठी काही लोकांनी मला मारहाण केल्याचं अक्षयने फेसबूक लाईव्हमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा अक्षय बोऱ्हाडेनं जुन्नर पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार जुन्नर पोलिसांनी शेरकर यांच्यावर भा.द.वि.क 323/324/504/506 व आर्म अॅक्ट 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षापासून मी आणि माझे कुटुंब एकत्र येत निराधार आणि मनोरुग्ण लोकांची सेवा करत आहोत. पण माझं चांगलं काम गावातील काही लोकांना सहन झालं नाही. त्यामुळे सत्यशील शेरकर यांनी मला बंगल्यावर बोलावून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांची सर्व लोकं नुसती बघत बसली. कोणीही मदतीसाठी आलं नाही. मला फोट्या बांबूने पायावर आणि पाठणीवर मारल्याचं अक्षयने सांगितलं.
शेरकर यांनी फेटाळले आरोप
शेरकर म्हणाले की, परिसरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात अक्षयने बाहेरून एका मनोरुग्णाला आणलं. ही माहिती मला गावकऱ्यांनी दिली. या संस्थेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. म्हणून ग्रामस्थांनी त्याला बोलावलं. तर ग्रामस्थांच्या प्रश्नाला अरेरावीची उत्तर देत अक्षय तिथून गेला आणि त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ बनवल्याचं शेरकर म्हणाले.
'सा रे गा मा पा' स्पर्धक राहिलेल्या गायकाचे मोदींविरोधात अनुचित शब्द, FIR दाखल
या प्रकरणात अमोल कोल्हेंनीही दिली होती प्रतिक्रिया
अमोल कोल्हे यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडत नाण्याची दुसरी बाजूही असू शकते असं म्हटलं आहे. सत्यशील हे माझे चांगले मित्र आहेत. ते असं काही करतील, यावर माझा विश्वास नाही. पण जर अन्याय झाला असेल तर त्यावर कारवाई करण्याच्या आणि सखोल चौकशी करण्याच्या सूचना आपण पोलीस विभागाला दिल्या असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, अक्षयने प्रसारित केलेला व्हिडिओ हा नाण्याची दुसरी बाजू असू शकते. फेसबूकचा असा व्हिडिओ पाहून मतं बनवणं योग्य नाही. त्यामुळे पोलिसांना त्यांचं काम करू द्या असं अमोर कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.
पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट
राजकीय पडसाद
दरम्यान, या प्रकरणावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या घटनेचा तीव्र निषेध केला. ‘अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.’म्हटलं.
भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले
'त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेणारा जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच पोलीस प्रशासनास आवाहन करतो की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करून या युवकास न्याय मीळवून द्यावा.'
भाजप नेते नितेश राणे
'अक्षय बोऱ्हाडे सारखा शिव प्रेमी हा आमचा अभिमान आहे !
त्यांनी असंख्य लोकांचे अश्रू पुसले आणि आज त्याचाच डोळ्यात अश्रू येण हे मनाला वेदना देणार आहे!!
पोलीस सानी कारवाई करावीच..
तो एकटा नाही हे लक्षात घ्या..
आमच लक्ष आहे..नाहीतर हर हर महादेव होणारच!!!'
पुण्यात डॉक्टरांची भरती होणार, आज लागणार 1283 जागांसाठी मेरिट लिस्ट
संपादन- रेणुका धायबर