कानपूर, 26 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याचा सर्वात जास्त त्रास हा परराज्यात अडकलेल्या मजुरांना झाला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र या ट्रेनमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. यामुळेच एका 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनमध्ये 10 महिन्याचे बाळ तापाने फणफणत होते. मात्र त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. टेलिग्राम या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक स्थानकावर मदत मागूनही रेल्वेकडून सहकार्य मिळाले नाही, असा आरोप बाळाच्या घरच्यांनी केला आहे. कोरोनाचा गेल्या 24 तासांत पुन्हा हाहाकार, मृतांची संख्याही 4167 वर रेल्वेचे डॉक्टर कोरोनामुळे कोव्हिड-19 रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे बाळावर उपचार उशीरा करण्यात आले, त्याआधीच बाळाचा मृत्यू झाल्याचे घरच्यांनी सांगितले. बाळाचे आजोबा देव लाल यांनी सांगितले की, “अलिगढ सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकात ही सोय नव्हती. आम्ही प्रत्येक स्थानकावर स्टेशन मास्तर यांना सांगूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही”. दरम्यान, या बाळाची तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बाळाच्या घरच्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरी, बाळाच्या मृत्युला कोण जबाबदार? हा प्रश्न मात्र कायम आहे. आईनं सासूला फसवण्यासाठी लेकराचा दिला बळी, 3 महिन्याच्या बाळाला संपवलं आणि… याआधीही तब्बल 60 तास उपाशी राहिल्यामुळे एका मजुराचा मृत्यू झाला होता. मजुराच्या घरच्यांनी त्यांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान देशभरातून लाखो मजुरांना रेल्वेने घरी पाठवले आहे. असे असले तरी अजूनही हजारो मजूर पायी प्रवास करत आहेत. तर ट्रेनने प्रावस करणाऱ्या मजुरांचेही हाल होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.