पुणे, 18 ऑगस्ट: नववी पास असणाऱ्या एका महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यासह इतर शहरातील अनेक व्यावसायिक आणि नोकरदार पुरुषांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात गुंतवल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या नवऱ्याच्या मित्राच्या मदतीनं हे हनी ट्रॅपचं जाळ विणलं होतं. बदनामी करण्याची भीती दाखवत आरोपींनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिसांनी सेक्सटॉर्शन करणाऱ्या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मुख्य आरोपी महिला इयत्ता नववी पास असून तिचा पतीही गुन्हेगार वृत्तीचा असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान आरोपी महिलेची आपल्या गुन्हेगार पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी सोशल मीडियावरून उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. आरोपींना आतापर्यंत पुण्यातीला अनेकांना आपल्या जाळ्यात गुंतवलं आहे. हेही वाचा- हो, मनाप्रमाणे न वागल्यानंच केला खेळ खल्लास, त्या थरारक घटनेत नराधम बापाची कबुली समाजात आणि सोशल मीडियावर बदनामी होण्याच्या भीतीनं अनेकजण आरोपींच्या दबावाला आणि धमक्यांना बळी पडले आहेत. पण चार दिवसांपूर्वी एका व्यावसायिकानं धाडस दाखवत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या 72 तासांत मुख्य आरोपीसह हनी ट्र्रॅप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. हेही वाचा- अन् स्वतःच्या हातानं कपडे काढत पूजेत नग्नावस्थेत बसवलं; अत्याचारानं नाशिक हादरलं नेमकं प्रकरण काय आहे? संबंधित आरोपींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पनवेल येथील व्यावसायिक नितीन दत्ता पवार (वय-31) याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात गुंतवलं होतं. यानंतर आरोपींनी पवार यांच्याकडे खंडणीची मागणी केली. पण पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं सहा जणांच्या टोळीनं पवार यांना मारहाण केली. यानंतर पवार यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी आणखी किती जणांना गंडा घातला याबाबत चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.