मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बिचारं! बाळाने गिळला बल्ब, एका निर्णयामुळे वाचला जीव; पाहा VIDEO

बिचारं! बाळाने गिळला बल्ब, एका निर्णयामुळे वाचला जीव; पाहा VIDEO

 एका सहा महिन्याच्या मुलीने बल्ब (6 month old gulp the bulb) गिळल्यानंतर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे.

एका सहा महिन्याच्या मुलीने बल्ब (6 month old gulp the bulb) गिळल्यानंतर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे.

एका सहा महिन्याच्या मुलीने बल्ब (6 month old gulp the bulb) गिळल्यानंतर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे.

  • Published by:  desk news

रांची, 27 ऑक्टोबर : एका सहा महिन्याच्या मुलीने बल्ब (6 month old gulp the bulb) गिळल्यानंतर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे. एका सहा वर्षांच्या बाळाने खेळता (Baby eat  bulb while playing) खेळता चक्क बल्ब तोंडात घातला. हा बल्ब तिच्या घशात अडकून बसल्यानंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. अगोदर घरच्यांनी तो बल्ब बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात (Family members unable to pull bulb out) त्यांना यश येईना. मग त्यांनी असा एक निर्णय घेतला, ज्यामुळे मुलीचे प्राण वाचले.

अशी घडली घटना

झारखंडमधील पलामू भागात एका सहा महिन्याच्या मुलीने खेळत असताना प्लॅस्टिकचा बल्ब पडलेला पाहिला. त्याचा रंग आकर्षक वाटल्यामुळे ती रांगत रांगत त्याच्या जवळ गेली. तो बल्ब उचलून तिने तोंडात घातला आणि खाऊ लागली. त्यामुळे बल्ब तिच्या घशात गेला आणि अडकून बसला. घशात असह्य वेदना होऊ लागल्यामुळे मुलगी रडू लागल्यावर कुटुंबीय धावत आले आणि नेमका प्रकार त्यांच्या लक्षात आला. " isDesktop="true" id="623705" >

घरीच बल्ब काढण्याचा प्रयत्न

सुरुवातील घरच्या मंडळींनी मुलीच्या घशातील बल्ब काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो इतक्या विचित्र प्रकारे अडकला होता की तो काढता येईना. मुलीच्या वेदना वाढत होत्या आणि तिचा श्वासही गुदमरायला लागला होता. त्यामुळे तिच्या पालकांनी मुलाला तातडीनं हुसैनबादच्या सरकारी रुग्णालयात हलवलं. तिथे ड्युटीवर असणाऱ्या डॉ. विकास कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या घशातून अलगद बल्ब बाहेर काढला आणि मुलीची सुटका झाली. हा बल्ब जवळपास दोन इंच लांब होता. ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हे वाचा- Dating Website वर नव्हत्या मनासारख्या मुली, तरुणानं कंपनीलाच खेचलं कोर्टात

सरकारी हॉस्पिटलवरचा विश्वास वाढला

साधारणतः गंभीर प्रकरणांमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नेण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न असतो. मात्र सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीचे प्राण वाचल्यामुळे यापुढे आपण कुठल्याही आजारावरील उपचारासाठी इथेच येणार असल्याचा निर्धार मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

First published:

Tags: Accident, Baby hospitalised, Small baby