मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Dating Website वर नव्हत्या मनासारख्या मुली, भडकलेल्या तरुणानं कंपनीलाच खेचलं कोर्टात

Dating Website वर नव्हत्या मनासारख्या मुली, भडकलेल्या तरुणानं कंपनीलाच खेचलं कोर्टात

डेटिंग वेबसाईटवर हव्या त्या प्रमाणात (A youth files case against dating website after not finding enough girl profiles) मुलींचे प्रोफाईल उपलब्ध नसल्यामुळे भडकलेल्या तरुणाने वेबसाईट चालवणाऱ्या कंपनीलाच कोर्टात खेचलं आहे.

कोलोराडो, 27 ऑक्टोबर : डेटिंग वेबसाईटवर हव्या त्या प्रमाणात (A youth files case against dating website after not finding enough girl profiles) मुलींचे प्रोफाईल उपलब्ध नसल्यामुळे भडकलेल्या तरुणाने वेबसाईट चालवणाऱ्या कंपनीलाच कोर्टात खेचलं आहे. जोडीदार शोधण्यासाठी पैसे खर्च करून त्यानं एका (Subscription of a dating website) डेटिंग वेबसाईटचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. या बेवसाईटवर आपल्याला मनाजोगा जोडीदार मिळेल, या अपेक्षेनं त्यानं खर्च करत सर्फिंगला सुरुवात केली होती. मात्र काही (Disappointment of a youth) दिवसांतच त्याचा भ्रमनिरास झाला.

का झाला भ्रमनिरास?

अमेरिकेतील कोलोराडोमध्ये राहणाऱ्या 29 वर्षांच्या इयान क्रॉसला जोडीदार शोधण्याची इच्छा होती. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे ब्रेकअप झाले असल्यामुळे डेटिंग वेबसाईवर मोठ्या संख्येनं 18 ते 35 वयोगटातील मुली लॉग इन करत असल्याचं त्याला सांगण्यात आलं. या वेबसाईटवर पार्टनर मिळण्याची शक्यता अधिक असून अनेक तरूण मुलींचे प्रोफाईल पाहता येतील, अशी ऑफर त्याला वेबसाईटने दिली होती. त्यासाठी भलीमोठी रक्कम मोजून त्याने वेबसाईटचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं.

मिळाले केवळ पाच प्रोफाईल

फेब्रुवारी महिन्यापासून या वेबसाईटवर डेटिंग करणाऱ्या इयानला आतापर्यंत केवळ पाच मुलींचे प्रोफाईल मिळाले. त्यामुळे कंपनीने आपली फसवणूक केली असल्याचा दावा करत त्याने वेबसाईटकडे तक्रार केली. वेबसाईटनं त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे वैतागलेल्या इयाननं वकिलांच्या मदतीनं कोर्टात खटला दाखल करल वेबसाईटला न्यायालयात खेचलं.

हे वाचा- वकिलाच्या प्रत्येक प्रश्नावर आरोपी म्हणायचा म्याऊ म्याऊ! न्यायाधीश वैतागले आणि..

पैसे मागितले परत

इयाननं आपली फसवणूक झाल्याचा दावा कोर्टात केला आहे. वेबसाईटनं आपले पैसे परत द्यावेत आणि आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही कोर्टात केली आहे. ही वेबसाईट खोटं बोलून ग्राहकांना लुटत असून त्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील इयाननं केली आहे. आता न्यायालयात याचा काय फैसला लागतो, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

First published:

Tags: Court, Online dating