मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांचे सामूहिक राजीनामे

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांचे सामूहिक राजीनामे

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे सामूहिक राजीनामे सादर केले आहेत. त्यांची जम्मूला बदली करावी किंवा त्यांना सुरक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

  • Published by:  Digital Desk

काश्मीर, 13 मे : गुरुवारी 35 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट (Kashmiri Pandit Rahul bhat gunned down) यांच्या हत्येवरून जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात तणाव वाढला आहे. राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे सामूहिक राजीनामे (Kashmiri Pandits Mass Resignations) पाठवले आहेत. राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लश्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-taiba) दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. लश्करशी संलग्न असलेल्या काश्मीर टायगर्स या संघटनेनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

विशेषत: विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी (migrant kashmiri pandits) सुरू करण्यात आलेल्या रोजगार कार्यक्रमांतर्गत राहुल भट यांना नोकरी मिळाली होती. ते चाडूरा येथील तहसील कार्यालयात काम करत होते. गोळी लागल्यानंतर राहुल भट यांना तत्काळ श्रीनगरच्या एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास लश्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी तहसील कार्यालयात घुसले आणि त्यांना तिथे बरीच गर्दी असतानाही त्यातून राहुल भट यांना शोधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. राहुल भट हे बडगाम जिल्ह्यातील विस्थापित वसाहतीत राहत होते आणि गेल्या आठ वर्षांपासून तेथे काम करत होते. राहुल भट यांच्या पश्चात पत्नी, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि पोलिसातून निवृत्त झालेले वडील असा परिवार आहे.

हे वाचा - 1987 मधील निवडणुकीत पहिल्यांदा दिसले मोदींचे 'गुजरात मॉडेल'- अमित शहा

गुरुवारी रात्री काश्मिरी पंडितांनी जम्मू-श्रीनगर महामार्ग आणि बारामुल्ला-श्रीनगर महामार्ग रोखून राहुल भट यांच्या हत्येचा निषेध केला. यावेळी त्यांनी राहुल भट यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सुरक्षेशिवाय ते कार्यालयात जाणार नसल्यानं त्यांची जम्मूला बदली करावी, अशी काश्मिरी पंडितांची मागणी आहे.

First published:

Tags: Jammu and kashmir, Terrorism