भिवंडी, 13 नोव्हेंबर : भिवंडीमध्ये (bhiwandi) मेट्रोचे (metro 5) काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात घडला आहे. लोखंडी पिलरच्या सळईच्या सांगाडा कोसळला असून या अपघातात 5 कामगार जखमी झाले आहे. तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली आहे. ठाणे-भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प 5 चे काम सुरू आहे. ठाणे ते धामणकर नाका या दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू असताना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेल समोर दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिलरचे काम सुरू आहे. 36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुमारे 30 ते 40 फूट उंचीचा लोखंडी सळईंचा सांगडा कोसळला. लोखंडी सांगडा हा थेट रस्त्यावर येऊन आदळला. या अपघातात 5 कामगार जखमी झाले असून त्यापैकी तीन कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. लोखंडी सळईंचा सांगाडा रस्त्याच्या मधोमध उभारला जात होता. नजीकचा रस्ता वर्दळीचा आहे. सुदैवाने, हा सांगाडा रस्त्याच्यामध्ये कोसळला परंतु त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. UPSC : केंद्राच्या या विभागात परीक्षा न देता व्हाल अधिकारी; पगारदेखील लाखांमध्ये या दुर्घटनेनंतर स्थानिक नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मोहम्मद शाहरुख,मोहम्मद मोहबुत,मोहम्मद अब्दुल अहद,मोहम्मद शकील ,मोहम्मद नावेद या जखमी कामगारांना नजीकच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील मार्गिके वर वाहतूक कोंडी झाली होती, मात्र यावर बोलण्यास मेट्रो, आणि पोलीस प्रशासनाने नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.