• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री 14 गाड्यांची तोडफोड; सुरक्षा रक्षकाचं विकृत कृत्य उघड

पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री 14 गाड्यांची तोडफोड; सुरक्षा रक्षकाचं विकृत कृत्य उघड

Crime in Pimpari Chinchwad: काल मध्यरात्री पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) 12 ते 14 वाहनांची तोडफोड (vehicles vandalism) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 11 जून: काल मध्यरात्री पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) 12 ते 14 वाहनांची तोडफोड (vehicles vandalism) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित वाहन एका खाजगी सोसायटीबाहेर उभी करण्यात आली होती. या सर्वचं वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. संबंधित वाहनांची तोडफोड करणारा दुसरा तिसरा कोणी नसून संबंधित सोसायटीचा सुरक्षा रक्षकच (Security Guard)आहे. आरोपी सुरक्षा रक्षकाने दारुच्या नशेत ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. संबंधित वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीच सुरक्षा रक्षकाचं नाव किरण गाडगे असून त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी किरण गाडगे म्हातोबा नगरमधील एका खासगी सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. काही भाजी विक्रेते आणि इतर वाहन चालक त्यांचे टेम्पो आणि इतर वाहन या सोसायटी समोर पार्क करत होती. त्याचबरोबर अनेक वाहनचालक याठिकाणी कचरा टाकत आणि लघवीही करायचे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असल्याने सोसायटीतील रहिवासीही त्रस्त झाले होते. वारंवार सांगूनही वाहनचालक ऐकत नसल्यानं आरोपी सुरक्षा रक्षकाचा राग अनावर झाला. त्यामुळे त्याने काल मध्यरात्री 12 ते 14 वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं आरोपी किरण आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. हे ही वाचा-झोपेत असणाऱ्या मुलीची आईनेच केली हत्या; डोक्यात दगड घालून काढला काटा, कारण उघड विशेष म्हणजे यापूर्वीही अशा वाहन तोडफोडीच्या अनेक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडल्या आहेत. मात्र संबंधित घटनांत गुन्हेगारांनी आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अशाप्रकारचं कृत्य केलं होतं. पण काल वाकड परिसरात घडलेली ही घटना याला अपवाद ठरली आहे. संबंधित वाहन चालकांनी वारंवार सांगूनही न ऐकल्यानं हा सुरक्षा रक्षकानं हा प्रकार केला आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: