नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 14 फेब्रुवारी : प्रेमामध्ये एकमेकांसोबत जीवन जगण्याचा दृढ निश्चय करणाऱ्यांपैकी किमान 12 ते 15 जण 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर नोंदणी पद्धतीने विवाह करीत विवाह बंधनात अडकले. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला ‘आली ही लग्न घटिका समीप ….. म्हणत 14 रोजीचा मुहूर्त न चुकविण्याची आठवण प्रेमवीर एकमेकांना करून देत होते. अशा काही नवविवाहितांचा आज जळगावात विवाह संपन्न झाला. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या प्रेमवीराकडून आणाभाका घेत सोबत आयुष्य जगण्याचा निर्धार केला जातो. यामध्ये अनेक वेळा कुटुंबीयांकडून विरोधही होतो तर कुठे संमती दिली जाते. त्यामुळे एक तर अशा जोडप्यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह लावून दिला गेला. नेहमीपेक्षा जास्त विवाह - दुसरीकडे पालकांच्या संमतीने तर कधी विरोधानंतरही तरुण-तरुणी आपल्या मर्जीने नोंदणी विवाह करीत असतात. त्यासाठी एक महिना अगोदर नोंदणी आवश्यक असते. एरव्ही दररोज पाच ते सहा विवाह होतात. पण प्रेमाचा दिवस असलेला 14 फेब्रुवारीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या दिवशी नोंदणी कार्यालयात नेहमीपेक्षा जास्त विवाह झाले. विवाह करण्यासाठी एक महिना अगोदर नोंदणी केल्यानंतर अनेक जण 14 फेब्रुवारी रोजी विवाहाचा मुहूर्त तर साधतात. सोबतच या दिवशी विवाहासाठी नोंदणी करूनदेखील ठेवत असतात. त्यामुळे अशा पद्धतीनेही हा दिवस स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हेही वाचा - प्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे गेल्या वर्षी म्हणजेच 2022मध्ये 14 फेब्रुवारी रोजी विवाह नोंदणी कार्यालयात 11 विवाह झाले होते. 14 फेब्रुवारीपूर्वी ही संख्या पाच ते सहा दरम्यान होती. मात्र, एकमेकांचे प्रेम व्यक्त करीत व आयुष्यभर लग्नाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने लक्षात रहावा म्हणून अनेक जण 14 फेब्रुवारी रोजी विवाह करतात. आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनेक विवाह संपन्न झाले. याची चर्चा शहरात रंगली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.