19 ऑक्टोबर :: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 288 जागांचे निकाल हाती आले आहे. निकालात भाजपने जोरदार आघाडी घेतलीय. भाजप आणि महायुतीने आतापर्यंत 121 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने आतापर्यंत 110 जागांवर आघाडी घेतली आहे. तर घटकपक्षांनी 1 जागांची भर घातली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर बँण्ड पथक बोलावण्यात आले. तर शिवसेना दुसर्या स्थानावर आहे. शिवसेनेनं आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर त्यानंतर काँग्रेस तिसर्या स्थानावर आहे. काँग्रेसने 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचा नंबर लागला आहे. राष्ट्रवादीने 41 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मनसेचं इंजिन घसरलं असून 2 जागांवर आघाडीवर आहे. (सविस्तर बातमी लवकरच) लढाई विधानसभेची एकूण मतदारसंघ 288 खुले मतदारसंघ - 234 अनुसूचित जातींसाठी राखीव - 29 अनुसूचित जमातींसाठी राखीव - 25 एकूण उमेदवार - 4119 भाजप - 280 काँग्रेस - 287 राष्ट्रवादी - 278 शिवसेना - 282 मनसे - 219 बसप - 260 सीपीआय - 34 सीपीएम - 19 इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष - 761 अपक्ष - 1699 +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++