21 एप्रिल : शरद पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू, श्रीमंत भोगी आहे, एककीकडे हे लोकांना शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचं सांगता तर दुसरीकडे यांचे पुतणे मतदानासाठी ग्रामस्थांना धमकी देतात. तुम्ही निवडणूक लढवा असं म्हणता तर योग्य वेळी निवडणूक लढवून दाखवेन असं सडेतोड उत्तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांना दिलं.
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत बीकेसी मैदानावर भव्य सभा पार पडली. या प्रचारसभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच एका स्टेजवर आले. यावेळी गोपीनाथ मुंडे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासह भाजप आणि सेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा गांधी घराण्यावर टीका केली.
काँग्रेस देशाला आपली जहागीर समजते -मोदी मोदींनी या सभेत मराठीतून भाषणाला सुरुवात करून मुंबईकरांची मन जिंकली. बाळासाहेब ठाकरे नसताना आता निवडणुकीमध्ये आपली जबाबदारी अधिक वाढली असून बाळासाहेबांना आनंद वाटेल असं काम करायचं आहे असं भावनिक आवाहन मोदींनी दिलं. तसंच काँग्रेस सरकारवर आसूड ओढत त्यांनी गांधी घराण्यावर सडकून टीका केली. घोटाळेबाज सरकारमुळे राष्ट्रकुल सारख्या स्पर्धेत देशाची प्रतिष्ठा कमी झालीय. आता काँग्रेसवर जनतेचा विश्वास उरला नाही. कारण काँग्रेसने दिलेली आश्वासन कधी पाळली नाही. मुळात काँग्रेसचं घोषणापत्र नाही तर हे धोकापत्र आहे अशी जळजळीत टीका मोदींनी केली.
राहुल गांधींसाठी गरिबी म्हणजे पर्यटन -मोदी
तसंच आम्ही जनतेला गरिबीतून बाहेर काढलं असं म्हणणार्या राहुल गांधींसाठी गरिबी म्हणजे पर्यटन आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना गरिबी काय कळणार ? असा टोलाही मोदींनी लगावला. तसंच दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या या सरकारने निर्भया फंड जाहीर केला पण यातला एक रुपयाही अजूनही खर्च केला गेला नाही असा आरोपही मोदींनी केला. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत आहे. खरंतर काँग्रेस जनतेला गृहीत धरतेय. आई आणि मुलाच्या ऑक्सिजनवर हा देश चालणार आहे का ? काँग्रेस देशाला आपली जहागीर समजते असा सणसणीत टोला मोदींनी गांधी घराण्याला लगावला.
आघाडीचं सरकार म्हणजे अली बाबा आणि चाळीस चोर - मुंडे तर आघाडीचं सरकार म्हणजे अली बाबा आणि चाळीस चोर असं असून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी खरमरीत टीका गोपीनाथ मुंडे यांनी केली. तसंच या निवडणुकीत महायुतीचे सगळ्यात जास्त खासदार महाराष्ट्रातून निवडून येतील असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला. फोटो सौजन्य - राजेश वराडकर +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







