30 जानेवारी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. कारण मुंबई महापालिकेत सेना-मनसेच्या युतीचा प्रस्ताव घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेल्याचं समजतंय.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘मातोश्री’वर अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज ठाकरेंचा निरोप दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन कळवतो, असं शिवसेना नेत्यांनी बाळा नांदगावकरांना सांगितले. मात्र,पण या प्रस्तावावर अजूनही शिवसेनेकडून काहीही उत्तर मिळालेलं नाही.
यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याकडे असा एक प्रस्ताव पाठवला होता. एका हातानं टाळी वाजत नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. पण आता यावेळेस राज आणि उद्धव एकत्र येऊन खरोखरच टाळी वाजणार का याची उत्सुकता वाढलीये.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावं, अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र त्यासाठी दोघांची इच्छा महत्त्वाची आहे, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेचे मनोहर जोशी यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv