जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आंध्रप्रदेशात 'टीडीपी'ची भाजपबरोबर युती

आंध्रप्रदेशात 'टीडीपी'ची भाजपबरोबर युती

आंध्रप्रदेशात 'टीडीपी'ची भाजपबरोबर युती

06 एप्रिल : भाजपला अखेर आंध्र प्रदेशात मित्र पक्ष मिळाला आहे. चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतर भाजप आणि तेलुगू देसमच्या निवडणूकपूर्व युती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीच्या या निर्णयामुळे एनडीएत आणखी एक घटक पक्ष सहभागी झाला आहे. टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहिर केला. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला, तरी अद्याप जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    tdp-bjp 06 एप्रिल : भाजपला अखेर आंध्र प्रदेशात मित्र पक्ष मिळाला आहे. चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतर भाजप आणि तेलुगू देसमच्या निवडणूकपूर्व युती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीच्या या निर्णयामुळे एनडीएत आणखी एक घटक पक्ष सहभागी झाला आहे. टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहिर केला. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला, तरी अद्याप जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. आंध्रच्या एकूण 42 जागांपैकी टीडीपी तेलंगणात भाजपला 8 तर सीमांध्रात 5 ते 6 जागा देण्याची देण्याची शक्यता आहे. भाजपच्या राज्य शाखेतून मात्र या युतीला विरोध होण्याचे संकेत मिळताहेत. तर दोन्ही पक्षांमध्ये काही नेते आणि कार्यकर्त्यांचा विरोध असला तरी दोन्ही पक्षांना त्याला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. या युतीमुळे वायएसआर काँग्रेस पुढंच आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात