जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / संघातले निष्ठावंतही भाजप इच्छुकांच्या यादीत?

संघातले निष्ठावंतही भाजप इच्छुकांच्या यादीत?

संघातले निष्ठावंतही भाजप इच्छुकांच्या यादीत?

प्रवीण मुधोळकर, नागपूर 20 जानेवारी : राजकारणात यायचं नाही, या भूमिकेला संघाचे कार्यकर्ते छेद देताना दिसतायत. कारण नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी संघ परिवारातील कार्यकर्तेही इच्छुक आहेत. एकीकडे नागपुरात भाजपकडून हजारो इच्छुक असतानाच संघ परिवारातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही तिकीट देण्याची कसरत भाजपला करावी लागतेय. लहानपणापासून संघाच्या शाखेत जाणारे राम कुंभलकर संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. संघाचा आणि राजकारणाचा थेट संबध नाही अशी शिकवण त्यांना लहाणपणापासून मिळाली. पण आता त्यांना राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करायची आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    प्रवीण मुधोळकर, नागपूर

    20 जानेवारी : राजकारणात यायचं नाही, या भूमिकेला संघाचे कार्यकर्ते छेद देताना दिसतायत. कारण नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी संघ परिवारातील कार्यकर्तेही इच्छुक आहेत. एकीकडे नागपुरात भाजपकडून हजारो इच्छुक असतानाच संघ परिवारातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही तिकीट देण्याची कसरत भाजपला करावी लागतेय.

    लहानपणापासून संघाच्या शाखेत जाणारे राम कुंभलकर संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. संघाचा आणि राजकारणाचा थेट संबध नाही अशी शिकवण त्यांना लहाणपणापासून मिळाली. पण आता त्यांना राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करायची आहे. त्यामुळे त्यांनी भाजपकडे तिकीट मागितलं आहे.

    जाहिरात
    VIJAYADASHMI AND SHASHTRAPUJAN OF RSS:Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रसेविका समिती आणि अभाविप या संघपरिवारातल्या शाखेच्या काही कार्यकर्त्यांना भाजपकडून तिकिटाची अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर संघ कार्यकर्त्यांनी एक खंतही व्यक्त केलीय.

    अशा संघनिष्ठावंतांना तिकीट द्यायचं झाल्यास प्रभागातली भाजपमधली बंडखोरी थांबवण्याची दुहेरी कसरतही भाजपला करावी लागणार आहे.

    भाजपनं संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तिकीट वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याच मान्य केलयं. जवळपास तीन हजार इच्छुकांच्या यादीतून 151 उमेदवारांची यादी जाहिर करतांना इलेक्टीव्ह मेरीट सोबतच संघनिष्ठेचाही विचार होणार असल्यानं नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: BJP , nagpur , RSS , shivsena , yuti
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात