मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पोस्ट पोल सर्व्हे : महायुतीची बाजी, आघाडीची पिछाडी !

पोस्ट पोल सर्व्हे : महायुतीची बाजी, आघाडीची पिछाडी !

2014maha_postpoll_12 मे : सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज संपलंय. आता ठीक चार दिवसांनी अर्थात 16 मे रोजी जनतेचा कौल कुणाला ? कोण होणार पंतप्रधान ? सत्ता कुणाची याची चर्चा आता सुरू झालीय. यासाठीच सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच CSDS ने आयबीएन नेटवर्कसाठी पोस्ट पोल सर्व्हे केला आहे.

एकूण दोन टप्प्यात आपण हा सर्व्हे पाहणार आहोत. पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघात सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये प्रत्यक्ष 895 मतदारांचा सहभाग होता. महाराष्ट्रात एकूण 48 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडलं.

सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या आखाड्यात दोन प्रबळ दावेदार असलेल्या भाजप, शिवसेना, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुती यात बाजी मारणार असून आघाडी सरकार बॅकफूटवर जाणार आहे. महायुतीला एकूण 33 ते 37 जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला 11 ते 15 जागा मिळतील.

मतांची टक्केवारी - 2009 आणि 2014

मतांची टक्केवारी पाहिली तर 2009 साली महायुतीला 37.8 टक्के इतकी होती. लोकसभेच्या मतदानापूर्वी हीच टक्केवारी 43 इतकी झाली आणि मतदानानंतर 44 टक्क्यांवर पोहचली. तर आघाडीची 2009 सालची टक्केवारी 38.9 टक्के इतकी होती आणि लोकसभेच्या मतदानापूर्वी ही टक्केवारी 33 टक्के इतकी झाली तर मतदानानंतर हीच टक्केवारी 34 वर पोहचली. महाराष्ट्राच्या राजकारणात 'खळ्ळ -खट्याक' असा दबदबा असलेल्या मनसेची मतदानाची टक्केवारी एकेरी आकडाच गाठू शकली. मनसेची मतदानापूर्वीची टक्केवारी 3 टक्के इतकी होती ती मतदानानंतरही 3 इतकीच राहिली. तर दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्‍या आम आदमी पार्टीची टक्केवारीही मतदानापूर्वी 5 इतकी होती ती 3 टक्क्यांवर येऊन आली.

पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्राची पसंती नरेंद्र मोदींनाच !

देशभरात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याची जोरदार चर्चा होती आणि या चर्चेला महाराष्ट्राच्या जनतेनंही दुजोरा दिला. पंतप्रधानपदाची पसंती कुणाला ? असा सवाल विचारला असता 42 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली. या अगोदर निवडणूकपूर्व सर्व्हेमधून महाराष्ट्राच्या जनतेनं मोदींनाच आपली पसंती दिली होती. जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 40 टक्के लोकांनी पसंती दिली होती ती मार्चमध्ये 2 टक्क्यांनी वाढून ती 42 टक्के इतकी झाली आणि मतदानानंतरही ती कायम राहिली. मोदींच्या तुलनेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जानेवारीमध्ये 14 टक्के लोकांनी पसंती दिली ती मार्चमध्ये 2 टक्क्यांनी वाढून 16 टक्के झाली आणि मतदानानंतर ती फक्त 12 टक्क्यांवर येऊन पोहचली तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फक्त 4 टक्के आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फक्त 3 टक्के लोकांनी पसंती दिली.

जागांचा अंदाज

महाराष्ट्र - एकूण जागा - 48

 • भाजप+ - 33-37
 • काँग्रेस + - 11-15
================================================================== 2009 सालीचा निकाल एकूण जागा- 48
 • काँग्रेस - 17
 • राष्ट्रवादी - 8
 • शिवसेना - 11
 • भाजप - 9
 • इतर - 3
 • बहुजन विकास आघाडी - 1
 • स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
 • अपक्ष - 1
================================================================== इतरही राज्यातील जागांचा अंदाज ================================================================== गुजरात - एकूण जागा - 26
 • भाजप - 21-25
 • काँग्रेस - 1-5
================================================================== दिल्ली -एकूण जागा - 7
 • भाजप - 5-7
 • आप - 0-2
================================================================== मध्य प्रदेश - एकूण जागा - 29
 • भाजप - 24-28
 • काँग्रेस - 1-5
================================================================== बिहार -एकूण जागा - 40
 • भाजप+ - 21-27
 • काँग्रेस + - 11-15
 • जेडीयू - 2-4
================================================================== उत्तर प्रदेश - एकूण जागा - 80
 • भाजप - 45-53
 • सपा- 13-17
 • बसप - 10-14
 • काँग्रेस - 3-5
================================================================== ओडिशा - एकूण जागा - 21
 • बिजू जनता दल - 12-16
 • भाजप - 3-7
 • काँग्रेस 1- 3
================================================================== पश्चिम बंगाल - एकूण जागा - 42
 • तृणमूल काँग्रेस - 25-31
 • डावी आघाडी - 7-11
 • काँग्रेस - 2-4
 • भाजप - 1-3
================================================================== केरळ - एकूण जागा - 20
 • यूडीएफ - 11-14
 • एलडीएफ - 6-9
================================================================== कर्नाटक - एकूण जागा - 28
 • काँग्रेस - 12-16
 • भाजप - 10-14
 • जेडीएस - 1-3
================================================================== तेलंगणा - एकूण जागा - 17
 • तेलंगणा राष्ट्र समिती - 8-12
 • काँग्रेस - 3-5
 • भाजप+ - 2-4
================================================================== सीमांध्रा -एकूण जागा - 25
 • YSR काँग्रेस - 11-15
 • भाजप + - 11-15
================================================================== तामिळनाडू - एकूण जागा - 39
 • अण्णा द्रमुक - 22-38
 • द्रमुक - 7-11
 • भाजप + - 4-6
================================================================== राजस्थान - एकूण जागा - 13
 • भाजप + - 6-9
 • काँग्रेस - 3-5
 • आप - 1-3
================================================================== पंजाब - एकूण जागा - 13
 • भाजप + - 6-9
 • काँग्रेस - 3-5
 • आप - 1-3
================================================================== +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published:

Tags: Ajit pawar, BJP, Congress, Election 2014, MNS, Nitin gadkari, Post poll, Raj and gadkari, Raj Thackeray Latest News, Raj Thackeray News, Raj thakare news, Raj thakarey, Raju shetty, Shiv sena, Svabhimani shetkari sanghatana, Toll, अजित पवार, उद्धव ठाकरे, गडकरी, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, पक्षप्रमुख, बारामती, भाजप, मनसे, महायुती, माढा, राज ठाकरे, राजू शेट्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पुढील बातम्या