20 ऑक्टोबर : दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख आपल्या आमदारांशी विधिमंडळातला नेता निवडण्यावर तसंच भाजपला पाठिंबा देण्याबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात काल (रविवारी) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज (सोमावारी) सत्ता स्थापण्याबाबतच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पडद्यामागे बर्याच हालचाली सुरू आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून पाठिंब्याची चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहेत. वेगळ्या विदर्भाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद आहेत, त्याबाबत भाजप काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> | 
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







