पटना, 20 मे : एकीकडे कोरोनाचं (Coronavirus) संकट तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे पोट भरणं अवघड झालं आहे. अशा कठीण प्रसंगी प्रत्येकालाच हिंमत ठेवणं शक्य नसतं. त्यातच एका 15 वर्षांच्या लेकीच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं जात आहे. ज्योती आपल्या वडिलांसह घरी पोहोचल्यानंतर दरभंगाचे डीएम त्याग राजन या ज्योतीच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
दरभंगाचे एसडीओ यांनी ज्योतीचं कौतुक करीत तिला श्रावण बाळाची उपमा दिली आहे. ज्योतीने ज्या प्रकारे धैर्य दाखवित आपल्या वडिलांना घरी आणलं हे अवघड होतं. ज्योतीचं 8 वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तिला यापुढेही शिकायची इच्छा आहे. लवकरच तिच्या पुढील शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय या कुटुंबाला सध्या काही सरकारी मदत मिळत आहे. यानंतरही आवश्यकतेनुसार सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
ज्योतीच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात लॉकडाऊन लागू झाल्याने ते पंजाबमधील गुरुग्राममध्ये अडकून पडले. लॉकडाऊनचा काळ वाढत होता आणि दुसरीकडे यांच्याकडून जेवण व पैसे संपत चालले होते. अशावेळी ज्योतीने आपल्या गावी दरभंगाला जाण्याचे ठरवले. वाहन सुरू नसल्याने तिने सायकलवरुन घर गाठण्याचे ठरविले. यावर तिच्या वडिलांनी सुरुवातीला नकार दिला. 1000 किमीने डबल सीट घेऊन प्रवास करणे अवघड काम होते. शेवटी उपाशी मरण्यापेक्षा ही जोखीम उचलत बाप-लेक सायकलवरुन मोठा रस्ता पार करण्यासाठी निघाले. मिळालेल्या माहितीनुसार 7 दिवसात ज्योतीने 1000 किमीचा टप्पा पार केला. मिळेल ते रस्त्यात खाऊन त्यांचा प्रवास सुरू होता. दोन दिवस तर त्यांना जेवायलाही मिळालं नाही. शेवटी त्यांनी पाणी पिऊन पोट भरलं. मात्र प्रवासात व्यत्यय येऊ दिला नाही. ज्योती दिवसाला 150 ते 200 किमीचा प्रवास करीत होती. तिच्या या धाडसाचं सर्वचजण कौतुक करत आहे.
संबंधित -भारतात कोरोनाचा उद्रेक, पण... आरोग्य मंत्रालयाने केला मोठा खुलासाकोरोना संक्रमणात अमेरिका जगात टॉप; ट्रम्प म्हणाले, 'ही सन्मानाची बाब'
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.