जोधपूर, 01 नोव्हेंबर: लग्नाला 15 दिवस बाकी असताना एका तरुणाने मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी दोघांना शोधून काढलं आहे. पोलिसांनी युवक युवतीला शोधून काढत दोघांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर मित्रांसह कुटुंबीयांना धक्का बसला आहे. संबंधित घटना राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील रातानाडा परिसरातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी एका कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. संबंधित मुलगी शुक्रवारपासून घरातून बेपत्ता असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. संबंधित मुलीचं अपहरण झालं की आणखी काही याबाबत कोणतीही माहिती कुटुंबीयांकडे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, संबंधित मुलगी लग्न करण्याच्या उद्देशाने पाबुपुराचा रहिवासी असलेल्या बादल नायक नावाच्या युवकासोबत पळून गेल्याची माहिती पोलीस तपासात मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत दोघा तरुण-तरुणीला शोधून काढलं आहे.
हेही वाचा-प्रेमात आड येणाऱ्या पतीला संपवण्यासाठी रचला खुनी खेळ; चॅटींगमधून फुटलं बिंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पळून गेलेल्या मुलीचं अमित नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध सुरू होते. तर बादल नायक हा अमितचा खास मित्र होता. संबंधित मुलीचं अमितसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, तिचं अमितचा मित्र बादलशी सूत जुळलं होतं. गेल्या सहा वर्षांपासून बादल आणि संबंधित तरुणी प्रेमसंबंधात होते. याचा काहीही थांगपत्ता अमितला नव्हता. दरम्यान अलीकडेच, बादल याचं एका वेगळ्याच मुलीश लग्न ठरलं होतं.
हेही वाचा-पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3महिने विकृत कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन्
लग्नाला 15 दिवस बाकी असतानाच, आरोपी बादल लग्न करण्याच्या उद्देशाने संबंधित मुलीला घेऊन फरार झाला होता. याप्रकरणी बादलच्या होणाऱ्या पत्नीने पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लग्न ठरल्यानंतर संबंधित युवती आणि बादल एकमेकांशी फोनवरून संपर्कात होते. लग्नाची तारीख जवळ आल्याने बादल शुक्रवारी तरुणीला घेत लग्न करण्यासाठी घरातून पळून गेला. पण दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने त्यांना लग्न करता आलं नाही. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rajasthan